सप्टेंबरमध्ये लहान मुलांनाही कोविड लस मिळणार?

सप्टेंबरमध्ये लहान मुलांनाही कोविड लस मिळणार?

भारतात सध्या कोविडवरील लसीकरण मोहिम वेगाने चालू आहे. त्यामध्ये लहान मुले वगळता इतर सर्वांचे लसीकरण चालू आहे. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण कधीपासून सुरू होणार याची उत्सुकता सर्व भारतीयांना लागलेली असताना, एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी या प्रश्नावर भाष्य केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस सप्टेंबर पर्यंत उपलब्ध होऊन, लहानमुलांचे लसीकरण सुरू होऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

शुक्रवारी एम्सचे मुख्य रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की सप्टेंबरमध्ये लहान मुलांसाठीची लस उपलब्ध होईल. लहान मुलांचे लसीकरण देखील प्रौढांप्रमाणेच टप्प्याटप्प्यात केले जाईल. गुलेरिया यांनी हे देखील सांगितले की, मुलांचे सशक्तीकरण करून लोकांमध्ये मुले सुरक्षित असल्याचा विश्वास निर्माण केला जाईल.

हे ही वाचा:

मालाडमधील त्या रहिवाशांचे पुनर्वसन होणार तरी केव्हा?

भारताने ‘ही’ मदत पाठवल्यामुळे बांग्लादेशने सोडला सुटकेचा निश्वास

आपत्तीची दरड….

गाळात रुतलेले संसार वाचविण्यासाठी तगमग

लहान मुलांवरील लसीची चाचणी टप्प्याटप्प्यात घेतली गेली. त्यामध्ये सर्वप्रथम १२ ते १८ वर्षांतील मुलांवर चाचणी घेतली गेली आणि त्यानंतर ६-१२ वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी करण्यात आली होती. सध्या अगदी लहान बालकांमध्ये वय २-६ वयोगटातील मुलांवर या लसीची चाचणी चालू आहे.

भारत बायोटेक बरोबरच झायडस कॅडिला देखील लसीचे उत्पादन करत आहे. या कंपनीने सादर केलेल्या आकडेवारीत, लहान मुलांवरील चाचणीचे आकडे देखील गोळा करण्यात आले आहेत.

भारतीतल लसीकरण मोहिमेची घोडदौड चालू आहे. आत्तापर्यंत भारताने किमान ४२ कोटी लोकांचे लसीकरण केले आहे. या वर्षाअखेरपर्यंत सर्व प्रौढांचे लसीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.

Exit mobile version