भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावले. नॉर्वेच्या फोर्डे येथे झालेल्या वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. या प्रतिष्ठित स्पर्धेत मीराबाईचे हे तिसरे पदक आहे.
मीराबाई चानू गेल्या काही दिवसांपासून दुखापतींशी झुंजत आहेत. यामुळे गेल्या काही स्पर्धांमध्ये त्यांची कामगिरी खराब होती, परंतु जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये त्या चमकल्या. २०२८ मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिकच्या तयारीसाठी त्यांचे रौप्य पदक एक मजबूत पाऊल मानले जात आहे.
मीराबाई चानू २०१७ मध्ये विश्वविजेती बनली आणि २०२२ मध्ये तिने रौप्यपदक जिंकले. यावेळी तिने ४८ किलो गटात भाग घेतला आणि एकूण १९९ किलो (८४ किलो स्नॅच + ११५ किलो क्लीन अँड जर्क) वजन उचलून रौप्य पदक जिंकले.
चानूची स्नॅचमध्ये कामगिरी अपेक्षेनुसार नव्हती. तिने दोनदा ८७ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी झाली. तथापि, तिसऱ्या प्रयत्नात तिने ८४ किलो वजन उचलले. त्यानंतर, तिने क्लीन अँड जर्कमध्ये शानदार पुनरागमन केले आणि तिन्ही प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केले. चानूने तीन प्रयत्नांमध्ये १०९ किलो, ११२ किलो आणि ११५ किलो वजन उचलून सर्वांना प्रभावित केले.
हे ही वाचा :
या स्पर्धेत उत्तर कोरियाच्या री सॉन्ग गमला सुवर्णपदक मिळाले. तिने २१३ किलो (९१ किलो स्नॅच + १२२ किलो क्लीन अँड जर्क) उचलून नवा विश्वविक्रम रचला. तर थायलंडच्या थनायाथोन सुक्चारोने कांस्यपदक जिंकले. तिने १९८ किलो (८८ + ११० किलो) उचलून कांस्यपदक जिंकले.
