“ये नया हिंदुस्तान है… घर में घुसेगा भी और मारेगा भी”; धुरंधर २ चा टीझर प्रदर्शित

“धुरंधर: द रिव्हेंज” १९ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार

“ये नया हिंदुस्तान है… घर में घुसेगा भी और मारेगा भी”; धुरंधर २ चा टीझर प्रदर्शित

आदित्य धर निर्मित रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित “धुरंधर” चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या “धुरंधर: द रिव्हेंज”चा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरने प्रदर्शित होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. “धुरंधर” सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर, प्रेक्षक या सीक्वलसाठी उत्सुक होते. हा टीझर १ मिनिट १२ सेकंदांचा असून यामध्ये रणवीर सिंगचा आक्रमक असा लूक समोर आला आहे. यात गोळीबार, हिंसाचार आणि मारामारी अशी दृश्ये आहेत. टीझरमधील शेवटची ओळ विशेष चर्चेची ठरली आहे. “हा नवा भारत आहे, तो घरातही शिरणार आणि मारणारही.”

टीझरवरून स्पष्टपणे दिसून येते की, या भागाची कथा पूर्वीपेक्षा अधिक तीव्र असेल. या टीझरमध्ये पहिल्या भागात संपलेल्या कथेची झलक दाखवली आहे. ही कथा रेहमान डकैत (अक्षय खन्ना) आणि रणवीर सिंगच्या व्यक्तिरेखेभोवती फिरते. रेहमान डकैतच्या मृत्यूनंतर, दुसरा भाग रणवीरच्या आव्हाने आणि संधींचा असणार आहे. टीझरमध्ये रणवीरने हमजाची भूमिका साकारण्यापूर्वी जसकीरत सिंग रंगीच्या व्यक्तिरेखेची झलक देखील दाखवण्यात आली आहे. या घटकांव्यतिरिक्त, टीझरमध्ये फारसे नवीन नाही, परंतु अ‍ॅक्शनने भरलेले दृश्ये चांगली छाप सोडतात.

हे ही वाचा:

Su-57 कराराची रशियासोबतची चर्चा निर्णायक टप्प्यावर!

उद्योगपतींनी भारत- अमेरिका व्यापार कराराचे केले स्वागत! काय दिल्या प्रतिक्रिया?

सोने- चांदीच्या घसरणीला ब्रेक; चांदीचे दर २१,००० ने वाढले

अमेरिका व्यापार करार: भारत ठरला चीन, पाकिस्तान, बांगलादेशपेक्षा वरचढ

पहिला भाग, “धुरंधर”, ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर सिनेमाने १००० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. हा चित्रपट अलीकडेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आणि पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. धुरंधरच्या पहिल्या भागाने इतिहास रचला आणि बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले. मोठ्या कलाकारांच्या सहभागाने, हा चित्रपट प्रदर्शित होताच आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला. प्रेक्षक आणि समीक्षकांनी सिनेमाची कथा, अभिनय याचे कौतुक केले, तर ओटीटी रिलीज झाल्यानंतरही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. आता, या सिक्वेलमध्ये रणवीर सिंगसोबत संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि इतर कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट १९ मार्च रोजी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version