रुग्णांसाठी मोठा दिलासा; कॅन्सर औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय!

आणखी ३६ औषधं स्वस्त होणार

रुग्णांसाठी मोठा दिलासा; कॅन्सर औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२५ सादर करताना आरोग्य क्षेत्रासाठी मोठी घोषणा करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयामुळे कर्करोग आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

मोफत वाटप होणाऱ्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय कॅन्सरच्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कॅन्सरची औषधं स्वस्त होणार आहेत. कॅन्सरशिवाय महत्त्वाची ३६ औषधं स्वस्त होणार. या आर्थिक वर्षात उत्तम आरोग्यसुविधा पुरवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॅन्सर ग्रस्त रुग्णांसाठी २०० डे-केअर कॅन्सर सेंटर तयार केले जाणार आहेत. कॅन्सर रुग्णांसाठी ही दिलासादायक घोषणा ठरेल. तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक कॅन्सर सेंटर उभारले जाईल.

हे ही वाचा : 

बळीराजाला दिलासा! किसान क्रेडीट कार्डवरील कर्जाची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांवर

दिलासादायक! व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ७ रुपयांची घट

दिल्ली निवडणुकीपूर्वी ‘आप’ला दणका; आठ आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी!

अमेरिकेत पुन्हा विमान अपघात; फिलाडेल्फिया विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ३० सेकंदातचं झाले होत्याचे नव्हते!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये ७५ हजार जागा वाढवण्यात येणार आहेत. एआयचा वापर आरोग्य क्षेत्रात करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना जाहीर करण्यात आली आहे. यात ८ कोटींहून अधिक मुलांना पोषक आहार पुरवला जाणार आहे. सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाईल, असेही त्या म्हणाल्या आहेत. अटल टिंकरिंग लॅब अशा ५० लाख लॅब पुढच्या पाच वर्षांत सरकारी शाळांमध्ये उभ्या केल्या जातील.

Exit mobile version