26 C
Mumbai
Saturday, February 15, 2025
घरअर्थजगतदिलासादायक! व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ७ रुपयांची घट

दिलासादायक! व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ७ रुपयांची घट

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही

Google News Follow

Related

देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या शनिवार, १ फेब्रुवारी रोजी २०२५- २६ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीचं मोठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती कमी झाल्या असून तब्बल ७ रुपयांची कपात करण्यात आली आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर आजपासून ७ रुपयांनी कमी केले आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात कपात करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. १ ऑगस्ट २०२४ पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

या बदलानंतर, दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत १,८०४ रुपयांऐवजी १,७९७ रुपये असेल. कोलकातामध्ये या गॅस सिलिंडरची किंमत १९११ रुपयांवरून १९०७ रुपयांवर आली आहे. तर मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर १७४९.५० रुपयांना उपलब्ध आहे. पूर्वी ते १७५६ रुपयांना उपलब्ध होते. चेन्नईमध्ये हे गॅस सिलिंडर १९५९.५० रुपयांना उपलब्ध असणार आहे.

हे ही वाचा : 

दिल्ली निवडणुकीपूर्वी ‘आप’ला दणका; आठ आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी!

अमेरिकेत पुन्हा विमान अपघात; फिलाडेल्फिया विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ३० सेकंदातचं झाले होत्याचे नव्हते!

फडणवीस-शिंदेना अडकवण्याचा डाव, SIT स्थापन!

राष्ट्रपतींवरील काँग्रेसची टिपण्णी म्हणजे देशातील १० कोटी आदिवासी बांधवांचा अपमान

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या दरांमध्ये होणारे बदल आणि इतर घटकांच्या आधारे तेल कंपन्या गॅस सिलिंडरचे दर बदलत असतात. डिसेंबरमध्ये, तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांची वाढ केली होती. आता या कमी केलेल्या किंमतींमुळे व्यावसायिक आस्थापने आणि लहान व्यवसायांवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे जे त्यांच्या कामकाजासाठी एलपीजीवर जास्त अवलंबून असतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
229,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा