रेड कार्पेट, आकाशात बी-२ बॉम्बर्स आणि लढाऊ विमाने…

ट्रम्प यांचे पुतीन यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन 

रेड कार्पेट, आकाशात बी-२ बॉम्बर्स आणि लढाऊ विमाने…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात अलास्कामध्ये भेट झाली. यादरम्यान अमेरिकेनेही आपली शक्ती दाखवून दिली आणि रशियन राष्ट्राध्यक्षांचे मनापासून स्वागत केले. जेव्हा व्लादिमीर पुतिन अँकरेज शहरातील जॉइंट बेस एल्मेनडॉर्फ-रिचर्डसन येथे त्यांच्या विमानातून उतरले आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटत होते, तेव्हा आकाशात ‘बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स’ आणि ‘एफ-२२ लढाऊ विमाने’ आणि ‘एफ-३५ लढाऊ विमाने’ उडताना दिसली. अमेरिका अशा भव्य स्वागताच्या माध्यमातून पुतिन यांना आपल्या लष्करी ताकदीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत होती.

‘बी-२ स्टेल्थ बॉम्बर’ हा तोच शक्तिशाली बॉम्बर आहे, ज्याने गेल्या महिन्यात इराणचे अणुऊर्जा प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. अमेरिकेने या बॉम्बरचा वापर फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील अणुऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करण्यासाठी केला होता. 

बी-२ बॉम्बरची वैशिष्ट्ये बघितल्यास रडारला चकवू शकणारं स्टेल्थ तंत्रज्ञानावर आधारित विमान आहे, अण्वस्त्र आणि पारंपरिक शस्त्रांची वाहतूक करण्यास सक्षम, अत्यंत गुप्त आणि लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी याचा वापर केला जातो.  तर ‘एफ-२२’ आणि ‘एफ-३५’ फायटर जेट्स हे अचूक लक्ष्यभेदी आणि हवाई वर्चस्वासाठी प्रसिद्ध आहेत. या शक्तिप्रदर्शनाद्वारे ट्रम्प यांनी केवळ अमेरिकेतील जनतेलाच नव्हे, तर जगालाही संदेश दिला की ते शक्तिशाली आणि सुरक्षित अमेरिकेचे नेतृत्व करू इच्छित आहेत.

हे ही वाचा : 

कृष्णाने कंसाचा वध करून प्रस्थापित केली लोकशाही

दहा थरांचा विश्वविक्रम… कोकण नगर गोविंदाचा पराक्रम!

गोरेगावमधील एकाच सोसायटीत चौथी आत्महत्या…

दूध खरेदी करण्यासाठी क्लिक केले अन १८.५ लाख रुपये गमावले!

दरम्यान, ट्रम्प यांच्या या कृतीने पुतीन यांच्याविरुद्ध एक प्रत्यक्ष न बोलता दिलेला इशारा समजला जात आहे. या शक्ती प्रदर्शनामागे ट्रम्प यांचा उद्देश रशियासहित संपूर्ण जगाला संदेश देण्याचा आहे कि ते शक्तिशाली अमेरिकेचे नेतृत्व करतात.

Exit mobile version