मुंबई हादरली; १२ वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार

पाच जणांना केली अटक

मुंबई हादरली; १२ वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार

पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका महिलेवर झालेल्या लैगिंक अत्याचाराच्या घटनेला आठवडा उलटत नाही, तोच मुंबईतील जोगेश्वरी येथे १२ वर्षाच्या मुलीवर पाच नराधमांनी लैगिंक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

या घटनेने मुंबईत खळबळ उडवून दिली असून मुंबईत देखील महिला,मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच आरोपीना अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जोगेश्वरी येथे राहणारी १२ वर्षाच्या मुलीवर काका रागावले म्हणून ती घर सोडून निघून गेली होती. या दरम्यान तीला एक तरुण भेटला, तो तिला घेऊन मरीन ड्राईव्ह येथे आला व त्यानंतर त्याने पुन्हा तीला जोगेश्वरी येथे आणून सोडले.दरम्यान रात्रीच्या वेळी तिला पाच तरुण भेटले आणि तिला घेऊन ते एका आरोपीच्या घरी घेऊन आले, व त्यापैकी तिघांनी तिच्यावर आळीपाळीने लैगिंक अत्याचार केला आणि एकाने प्रयत्न केला.

दुसऱ्या सकाळी आरोपीनी पीडित मुलीला घरी जाण्यास सांगितले,परंतु पीडित मुलगी घरी न जाता, आरोपीच्या पाठोपाठ ती जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर आली. तेथून ती दादर रेल्वे स्थानकावर आली. दादर रेल्वे स्थानकावर पिडीत मुलगी एकटी फिरत असताना रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ती जोगेश्वरी येथे राहण्यास असल्याचे रेल्वे पोलिसांना सांगितले.

हे ही वाचा:

‘अकबर’ बलात्कारी होता तर ‘औरंगजेब’ने असंख्य हिंदूंची हत्या केली!

विराट हा सर्वोत्तम वनडे खेळाडू…मायकेल क्लार्कने केली स्तुती

संतोष देशमुख प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यानंतरचं हत्येचे फोटो पाहिले

सावरकर बदनामी प्रकरणी न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या राहुल गांधींना दंड!

रेल्वे पोलिसांनी जोगेश्वरी पोलिसांकडे संपर्क साधला असता जोगेश्वरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली रेल्वे पोलिसांनी तात्काळ पीडित मुलीचा ताबा जोगेश्वरी पोलिसांकडे दिले.
जोगेश्वरी पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला असता तिने तिच्या जबाबात तिच्यावर झालेल्या लैगिंक अत्याचार झाल्याची माहिती दिली.

जोगेश्वरी पोलिसांनी तात्काळ पाच जणांविरुद्ध भा. न्या. सं.कलम ६५ (२),७० (२) ७४,३५१(३)३(,५) पोक्सो कायदा कलम ४,६,८,१० अनव्ये गुन्हा दाखल करून पाचही नराधमांना अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version