राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी मुघल सम्राट अकबर याचे वर्णन “बलात्कारी, आक्रमक आणि लुटारू” असे केले आहे. मंगळवारी (४ मार्च) विधानसभेत शिक्षण विभागाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री मदन दिलावर यांनी ही टिप्पणी केली.
इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मुघलांना जास्त स्थान दिल्याबद्दल मागील काँग्रेस राजवटींवर आरोप करत मंत्री दिलावर म्हणाले, “त्यांनी महाराणा प्रताप यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला. आणि ‘मीना बाजार’ उभारणारा अकबर बलात्कारी, आक्रमक आणि लुटारू होता, त्याला महान म्हटले गेले. हा आपल्या महापुरुषांच्या देशाचा अपमान होता. हे सहन केले जाऊ शकत नाही.”
हे ही वाचा :
केंब्रिज विद्यापीठात दोनदा नापास होणाऱ्या राजीव गांधींची पंतप्रधान पदी निवड आश्चर्यकारक!
बांगलादेशी घुसखोरांच्या मददगारांवर जमालगोटा कारवाई सुरू…
विराट हा सर्वोत्तम वनडे खेळाडू…मायकेल क्लार्कने केली स्तुती
संतोष देशमुख प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यानंतरचं हत्येचे फोटो पाहिले
पाठ्यपुस्तकांमध्ये औरंगजेब आणि तैमूर सारख्या “क्रूर शासकांचे” नकारात्मक पैलू कसे वगळण्यात आले याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले, “औरंगजेबने असंख्य हिंदूंची हत्या केली, शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली आणि जिझिया कर लादला. परंतु देशातील विद्यार्थ्यांपासून वास्तव लपवून ठेवले गेले आणि अनेक वर्षे शिकवले जात होते. आक्रमक आणि क्रूर शासक तैमूरचे वर्णन पाठ्यपुस्तकांमध्ये महान असे केले गेले, जे पूर्णपणे चुकीचे होते, असे शिक्षण मंत्री मदन दिलावर म्हणाले.
शिक्षण मंत्र्यांच्या भाषणावेळी विरोधकांनी गदारोळ घालत अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांना फटकारत मंत्र्यांनी आपले भाषण पूर्ण केले. विरोधकांच्या गदारोळावर राजस्थान भाजपचे उपाध्यक्ष मुकेश दधीच म्हणाले, “काही काँग्रेसी असे आहेत ज्यांना अकबरवर इतके प्रेम आहे की ते एका मंत्र्याला अडवत आहेत.”