31 C
Mumbai
Tuesday, June 9, 2026
घरविशेषदादरच्या प्लाझा जवळ बेस्ट बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

दादरच्या प्लाझा जवळ बेस्ट बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

अनियंत्रित बसची पाच वाहनांना धडक

Google News Follow

Related

दादर येथील वीर कोतवाल उद्यान परिसरात सोमवारी (८ जून) सकाळी भीषण अपघात घडला. एका इलेक्ट्रिक बेस्ट बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने समोरील पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन दुचाकीस्वार आणि बस वाहक असे तिघे जण जखमी झाले होते. जखमींना तातडीने उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, एकाचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ९.३० च्या सुमारास बेस्टची इलेक्ट्रिक बस (मार्ग क्र. ४६३/३१) दादरच्या दिशेने येत होती. दरम्यान, प्लाझा सिनेमासमोरील वीर कोतवाल उद्यानाजवळ बसचालकाचा ताबा सुटल्याने बसने समोरील वाहनांना एकापाठोपाठ धडक दिली. यामध्ये एक ॲक्टिव्हा, एक इलेक्ट्रिक दुचाकी, एक टॅक्सी, बलेनो कार आणि एका इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की, या धडकेत दुचाकीस्वारांचे मोठे नुकसान झाले आहे.

सायन रुग्णालयातील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (AMO) डॉ. रणधीर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण चार  जण जखमी असल्याची नोंद करण्यात आली आहे.

अज्ञात पुरुष (वय अंदाजे 22 ते 25 वर्षे) – रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित.

ऋषभ गुप्ता (पुरुष, वय अंदाजे 25 ते 30 वर्षे) – डोक्याला गंभीर दुखापत, प्रकृती चिंताजनक.

सतीश वाघांबरे (पुरुष, 48 वर्षे, बेस्ट निरीक्षक) – छाती आणि कंबरेला दुखापत.

महेश दोईफोडे (पुरुष, 50 वर्षे) – डाव्या खांद्याला दुखापत तसेच बोथट आघात (Blunt Trauma).

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि मदत पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने शीव रुग्णालयात रवाना करण्यात आले. पोलीस पथकाने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक कोंडीची समस्या सोडवली असून, सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे.

हे ही वाचा:

फिलिपिन्समध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप; इंडोनेशिया, जपानला त्सुनामीचा इशारा

पश्चिम आशियातील तणावाचा बाजाराला फटका; सेन्सेक्स-निफ्टीत १% पेक्षा जास्त घसरण

नीट पुनर्परीक्षा प्रक्रियेतील तज्ञ २१ जूनपर्यंत लॉकडाउनमध्ये!

… आणि ट्रम्प मुलाखतीदरम्यान संतापले; मायक्रोफोन काढला, निघून गेले!

या प्रकरणी बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, सुरुवातीच्या प्राथमिक माहितीमध्ये चार पादचारी जखमी झाल्याची नोंद मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली होती. या भीषण अपघातामुळे दादर परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
312,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा