काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राहुल गांधी यांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधीना दंड ठोठवण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांकडून पेन्शन घेत होते, असे वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधीनी केले होते. कोर्टाने कारवाई करत त्यांना दंड ठोठावला आहे.
२०२२ मध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर असताना राहुल गांधीनी वीर सावरकरांबद्दल बेताल वक्तव्य केले होते. या प्रकरणी राहुल गांधींच्या विरोधात लखनौ कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणी दरम्यान कोर्टाने राहुल गांधीना २०० रुपयाचा दंड ठोठावला आहे. तसेच १४ एप्रिलला कोर्टात हाजीर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि हजर न राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा इशाराही दिला आहे.
राहुल गांधी गेल्या काही वर्षांपासून सतत वीर सावरकरांविरोधात बोलत आलेले आहेत. १७ डिसेंबर २०२२ मध्ये त्यांनी अकोलामध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. वीर सावरकर इंग्रजांचे नोकर आहेत, इंग्रजांकडून ते पेन्शन घेत होते, असे राहुल गांधी म्हणाले होते.
हे ही वाचा :
बरे वाईट झाले तर सरकार जबाबदार!
भारतीय शेअर बाजाराचे दमदार पुनरागमन
अबू आझमींसोबतचे उद्धव ठाकरेंचे छायाचित्र शेअर करत भातखळकरांनी काढला चिमटा
एमके स्टॅलिन आणि अण्णामलाई यांच्यात ‘भाषेवरून’ जुंपली
या प्रकरणी भूपेंद्र पांडे यांनी लखनौ कोर्टात याचिका दाखल केली होती. याची आज सुनावणी झाली. या अगोदरही सुनावणी झाली. मात्र, दरवेळी राहुल गांधी अनुपस्थित राहिले. आजच्या सुनावणीत कोर्टाने राहुल गांधीना कडक आदेश देत २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच २५ एप्रिलच्या सुनावणीत त्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला पाहिजेत अन्यथा कठोर कारवाई म्हणजे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा इशारा कोर्टाने दिला आहे.