समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना आज विधानसभेतून निलंबित करण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधी दरम्यान त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यासह निलंबनाचा कालावधी ठरवण्यासाठी एक समिती देखील गठीत करण्यात आली आहे. याच दरम्यान, अबू आझमी यांच्या निलंबनावर त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अबू आझमी म्हणाले, फोन करून मला लोक शिव्या देत आहेत, यामुळे मी माझा टेलीफोन उचलत नाहीये. असे हजारो फोन मला येत आहेत. देश विरोधी असे कोणतेच वक्तव्य केलेले नाही, देशातील एका राजाबाबत इतिहासात जे लिहिले आहे तेच बोललो आहे, माझ्या मनाने काहीच बोललो नाही. मिडीयाने मला जेव्हा रोखून विचारले तेव्हाच मी बोललो.
ते पुढे म्हणाले, महापुरुषांच्या विरोधात मी कधीच काही बोललो नाही. मुख्यमंत्र्यांसोबत भेटी घेवून मी स्वतः त्यांना सांगितले कि जे कोणी लोक महापुरुषांबद्दल वाईट बोलतात अशा लोकांना १० वर्षांची शिक्षा झाली पाहिजे, मग मी विरोधात कसा बोलू शकतो?. मी त्याकाळी जिवंत नसल्यामुळे जे लिहिलेले आहे तेच बोललो आहे, असे अबू आझमी म्हणाले.
हे ही वाचा :
भारतीय शेअर बाजाराचे दमदार पुनरागमन
अबू आझमींसोबतचे उद्धव ठाकरेंचे छायाचित्र शेअर करत भातखळकरांनी काढला चिमटा
मध्य प्रदेशात वक्फ बोर्ड म्हणते शिवलिंग, मंदिर आमच्या मालकीचे!
सोनप्रयागहून केदारनाथ ३६ मिनिटांत गाठता येणार; रोपवे प्रकल्पाला मंजुरी
दरम्यान, औरंगजेबाचे कौतुक केल्याबद्दल अबू आझमी यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. अबू आझमी यांच्या विरोधात विधिमंडळात निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. अबू आझमी यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरातून टीका होत आहेत, ठिकठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात येत आहेत. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाची मागणी होत आहे.