मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभाराने पुन्हा एकदा लोकांना आश्चर्यचकित केले आहे. वक्फ बोर्डाने हिंदूबहुल गाव असलेल्या ‘माखानी’वर दावा केला आहे. एवढेच नाही तर त्याने गावात असलेले शिवलिंगही आपली मालमत्ता म्हणून घोषित केले आहे. वक्फ बोर्डाने ग्रामस्थांना नोटीस पाठवून म्हटले आहे की ते ज्या जमिनीवर राहत आहेत ती त्यांची आहे आणि त्यांना ती रिकामी करावी लागेल.
वृत्तानुसार, वक्फ बोर्डाचे म्हणणे आहे की माखानी गावातील ही जमीन स्मशानभूमीची आहे. वक्फने ३ एकर जमिनीवर दावा केला आहे. यामध्ये गावकऱ्यांची घरे, शेत, शिवलिंग-मंदिराचा समावेश आहे. वक्फ बोर्डाने गावातील लोकांना नोटीस पाठवून जमीन लवकरात लवकर रिकामी करण्यास आणि तिथून स्थलांतर करण्यास सांगितले आहे. या घटनेनंतर गावकरी चिंतेत आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे सरकारी नोंदींमध्ये ही जमीन सरकारची आहे, तरीही वक्फ ती स्वतःची असल्याचा दावा करत आहे. वक्फ बोर्डाचा दावा आहे की हे गाव कादर खान नावाच्या व्यक्तीचे होते, ज्याने त्यांना जमीन दान केली होती. पण गावकरी म्हणतात की कादर खान कधीच इथे राहिला नव्हता.
हे ही वाचा :
सोनप्रयागहून केदारनाथ ३६ मिनिटांत गाठता येणार; रोपवे प्रकल्पाला मंजुरी
भारताविरुद्ध किमान २८० धावा करायला हव्या होत्या!
अबू आझमींना उत्तर प्रदेशात पाठवा, आम्ही त्यांच्यावर उपचार करू!
कोरटकर तर चिल्लर, आव्हाडांवर बोला, नेहरूंचा निषेध करा, आहे हिंमत?
अनेक पिढ्यांपासून येथे राहणाऱ्या हिंदू कुटुंबांनी स्पष्टपणे सांगितले की ते त्यांची जमीन सोडणार नाहीत आणि वक्फच्या या कृतीविरुद्ध लढा देवू. घर, शेत आणि त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या शिवलिंगावरही वक्फ बोर्डने दावा केल्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला आहे.