27 C
Mumbai
Tuesday, March 25, 2025
घरराजकारणअबू आझमींसोबतचे उद्धव ठाकरेंचे छायाचित्र शेअर करत भातखळकरांनी काढला चिमटा

अबू आझमींसोबतचे उद्धव ठाकरेंचे छायाचित्र शेअर करत भातखळकरांनी काढला चिमटा

अबू आझमींनी केले होते औरंगजेबाचे कौतुक

Google News Follow

Related

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाला मी क्रूर शासक मानत नाही, तो महान राजा होता, अशी वक्तव्ये करत खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत होता. अखेर त्यांना विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित करण्यात आले. त्यावर भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी चिमटा काढणारी पोस्ट केली आहे.

भातखळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांची अबू आझमी यांनी मातोश्रीवर भेट घेतली होती, तेव्हाचे छायाचित्र टाकले आहे. त्यात बोलेगा तो बोलोगे की बोलता है असे वाक्यही लिहिले आहे. उद्धव ठाकरे प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर या मुद्द्यावर टीका करताना अबू आझमींनी औरंगजेबाच्या केलेल्या कौतुकूबद्दल मात्र तेवढी तिखट प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत. यावरूनच भातखळकर यांनी ही खोचक पोस्ट टाकली आहे.

अबू आझमी यांनी नरमाईची भूमिका घेत आपले वक्तव्य मागे घेतले आहे. परंतु, औरंगजेबचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमी यांच्या विरोधात विविध पक्षांकडून राज्यभर आंदोलन सुरू असताना ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जात नसल्याचे दिसते आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून राज्यभरात विविध ठिकाणी अबू आझमी यांच्या निषेधार्थ आंदोलन केले जात आहे. पुण्यातही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. चिखली येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी अबू आझमी यांच्या पुतळ्याचे दहन केले. मिरज शहरात शिवसेनेच्या वतीने अबू आझमी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. दुसरीकडे भाजपा आमदारांनीही विधीमंडळात अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी उचलून धरली होती. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ही मागणी लावून धरली आणि अखेर आज अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

सोनप्रयागहून केदारनाथ ३६ मिनिटांत गाठता येणार; रोपवे प्रकल्पाला मंजुरी

भारताविरुद्ध किमान २८० धावा करायला हव्या होत्या!

अबू आझमींना उत्तर प्रदेशात पाठवा, आम्ही त्यांच्यावर उपचार करू!

कोरटकर तर चिल्लर, आव्हाडांवर बोला, नेहरूंचा निषेध करा, आहे हिंमत?

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, यावर बरीच चर्चा झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या ज्यांना आपण देव मानतो त्यांच्याबद्दल वाईट बोलणाऱ्या कोणालाही आम्ही माफ करणार नाही असा आमचा ठाम विश्वास आहे. पण उद्धव ठाकरेंकडून अबू आझमी यांची खरडपट्टी मात्र काढण्यात आली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा