छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्फ वक्तव्य करणाऱ्या लोकांना १०० टक्के जेलमध्ये टाकू. या कोरटकरनं कोल्हापूरच्या कोर्टातून अटकेवर स्थगिती घेतली आहे. त्यावर मी वरच्या कोर्टात जायला सांगितलं आहे. पण हे कोरटकर तर चिल्लर लोक आहेत. मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलले? त्याचा कधी निषेध केला नाही तुम्ही.
जितेंद्र आव्हाड म्हणतात औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराज होते? औरंगजेब बलाढ्य होता, महाराज पाच फुटांचे होते हे रेकॉर्डवर आहे. त्याचा निषेध कधी केला नाही तुम्ही?, असे सिलेक्टिव्ह करू नका?, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांना केला. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाईची मागणी करण्याची मागणी विधानपरिषदेत विरोधकांनी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाईचे आश्वासन देत पंडित नेहरू, जितेंद्र आव्हाड, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर विरोधकांच्या शांतातेवरून धारेवर धरले.
हे ही वाचा :
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती
भाऊ आनंद कुमार यांच्या जागी मायावतींनी रणधीर बेनीवालना नेमले राष्ट्रीय समन्वयक
५५ लाख परदेशी भाविक महाकुंभात डुंबले
कपड्यात लपवून सोने आणणारी पोलीस महासंचालकांची मुलगी जेरबंद!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षक, स्वराज्यवीर, शौर्याचे प्रतिक आहेत. छत्रपती संभाजी महाराज असे व्यक्तिमत्व आहे, यांच्याबद्दल असे म्हटले आहे ‘देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था’.
ते पुढे म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलं, त्याचा निषेध तुम्ही करणार आहात का? आहे का हिंमत तुमच्यामध्ये?, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आम्ही सहन करणार नाही. याठिकाणी पंडित नेहरू यांचा धिक्कार झाला पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.