27.9 C
Mumbai
Thursday, August 6, 2026
घरविशेषपंतप्रधान मोदींचा व्हीडिओ हटवल्याबद्दल मेटा आली गुडघ्यावर

पंतप्रधान मोदींचा व्हीडिओ हटवल्याबद्दल मेटा आली गुडघ्यावर

झुकरबर्ग यांच्या माफीनाम्यावरून केंद्राचा दबाव

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेसबुकवरील व्हिडिओ काही तासांसाठी हटवल्याच्या प्रकरणात मेटाने अखेर माफी मागितली आहे. मेटाचे मुख्य जागतिक व्यवहार अधिकारी जोएल कॅपलन यांनी ही कंपनीची चूक असल्याचे मान्य केले. पंतप्रधान मोदींची पोस्ट प्रतिबंधित झाल्याबद्दल मेटाच्या वतीने संबंधित केंद्रीय मंत्र्यांकडे माफी मागितल्याचे कॅपलन यांनी सांगितले.

मात्र, या प्रकरणामुळे केंद्र सरकार आणि मेटामधील तणाव वाढला आहे. संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान विषयक स्थायी समितीने मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी स्वतः माफी मागावी, अशी मागणी केली होती. झुकरबर्ग यांनी तीन दिवसांत माफी न मागितल्यास त्यांना मिळणारे संरक्षण आणि कायदेशीर प्रतिरक्षा काढून घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मोदींचा व्हिडिओ काही तासांसाठी गायब

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी आणि ‘जनरेशन झेड’ला उद्देशून परीक्षा गैरप्रकार आणि पेपरफुटीविरोधातील कारवाईबाबत संदेश दिला होता. हा व्हिडिओ फेसबुकवरून काही तास उपलब्ध नव्हता. लोकसभा सचिवालयाच्या अधिकाऱ्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली.

पंतप्रधानांचा व्हिडिओ सुमारे पाच ते सहा तास फेसबुकवरून हटवला जाणे ही बाब समितीने अत्यंत गंभीर मानल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. मेटाच्या प्रतिनिधींनी यापूर्वी समितीसमोर व्हिडिओ सुमारे रात्री १२.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत उपलब्ध नसल्याचे मान्य केले होते.

‘ही मेटाची चूक होती’

मेटाचे जागतिक व्यवहार प्रमुख जोएल कॅपलन यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना पंतप्रधान मोदींची पोस्ट प्रतिबंधित करण्याची कारवाई चुकीची असल्याचे सांगितले. मेटाच्या वतीने संबंधित मंत्र्यांकडे या चुकीबद्दल माफी मागितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवण्यामागे कोणतेही जाणीवपूर्वक राजकीय कारण नसून ही कंपनीच्या प्रक्रियेत झालेली चूक होती, अशी मेटाची भूमिका दिसून येत आहे.

हे ही वाचा:

सुनेत्रा पवार प्रकरणावरून धनंजय मुंडेंना सुनील तटकरेंचा इशारा

अनधिकृत स्पर्धांवर पीसीबीचा चाप

पाकिस्तानसे गिरे, खजूर भारत मे अटके…किंमत ३ कोटी

बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदूच्या घराची टेहळणी

 

झुकरबर्ग यांनीही माफी मागावी

या प्रकरणाची संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान विषयक स्थायी समितीने गंभीर दखल घेतली आहे. समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी या प्रकरणात वैयक्तिकरित्या माफी मागावी, अशी मागणी केली होती. मेटाच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या बैठकीनंतर दुबे यांनी व्हिडिओ सुमारे पाच तास फेसबुकवरून गायब असल्याचे कंपनीने मान्य केल्याचे सांगितले.

दरम्यान, लोकसभा सचिवालयाकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात झुकरबर्ग यांनी तीन दिवसांत माफी न मागितल्यास त्यांना मिळणारे संरक्षण आणि प्रतिरक्षा मागे घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

केंद्र विरुद्ध सोशल मीडिया कंपन्या संघर्ष ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ काही तासांसाठी फेसबुकवरून हटवला जाणे, त्यानंतर मेटाने ‘चूक’ मान्य करून माफी मागणे आणि संसदीय समितीने मार्क झुकरबर्ग यांच्या माफीनाम्याची मागणी करणे, यामुळे सोशल मीडिया कंपन्यांच्या उत्तरदायित्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्याचवेळी बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तयार होणारी दिशाभूल करणारी सामग्री, सामग्री नियंत्रण आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील सुरक्षित कायदेशीर संरक्षण यांसारख्या मुद्द्यांवर केंद्र सरकारने मेटाला कठोर भूमिका दाखवली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा