चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताकडून चार विकेट्सनी पराभव स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याा निराशा लपवता आली नाही. स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, जर ऑस्ट्रेलियन संघाने २८० पेक्षा जास्त धावा केल्या असत्या, तर सामन्याचा निकाल वेगळा असू शकला असता.
भारताने २६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत फायनलमध्ये स्थान मिळवले, ज्यामध्ये विराट कोहलीने ८४ धावांची शानदार खेळी केली, तर के.एल. राहुल (नाबाद ४२) आणि हार्दिक पांड्या (२४ चेंडूंमध्ये २८) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याआधी, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार स्मिथने ७३ धावा आणि मार्नस लाबुशेनने ६१ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया ४९.३ षटकांत २६४ धावांवर गारद झाला. मोहम्मद शमीने तीन बळी घेतले, तर रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.
स्मिथ म्हणाला, आमच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली, त्यांनी संपूर्ण सामन्यात कठोर परिश्रम घेतले आणि फिरकी गोलंदाजांनी दडपण कायम ठेवले. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती. खेळपट्टीवर स्ट्राइक रोटेट करणे कठीण होत होते. आम्ही महत्त्वाच्या क्षणी काही फलंदाज गमावले, ज्यामुळे आम्हाला मोठी धावसंख्या करता आली नाही.
हे ही वाचा:
राम मंदिर हल्ल्याच्या कट प्रकरणात रहमानला मिळत होत्या दहशतवाद्याकडून सूचना
औरंगजेबाला महान राजा म्हणणारे अबू आझमी निलंबित!
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती
मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एफडीआय इक्विटी इनफ्लो १६५ अब्ज डॉलरवर
स्मिथ पुढे म्हणाला, जर आम्ही २८० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करू शकलो असतो, तर परिस्थिती वेगळी असती. गोलंदाजी विभागाने चांगली कामगिरी केली आणि काही फलंदाजांनीही चांगली खेळी केली. इंग्लंडविरुद्ध आमचा खेळ उत्कृष्ट होता. आमच्याकडे उत्कृष्ट खेळाडू आहेत, जे पुढे आणखी चांगली कामगिरी करतील.
लक्षात घेण्यासारखे म्हणजे कंगारू संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांचे प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क यांच्या अनुपस्थितीत खेळ खेळला होता. तरीसुद्धा, कर्णधार स्मिथच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली, पण भारताविरुद्ध संघाची गोलंदाजी कमकुवत ठरली. ऑस्ट्रेलियातील क्रिकेट विश्लेषकांचे म्हणणे आहे की, जर त्यांनी विराट कोहलीला लवकर बाद केले असते तर सामन्याचा निकाल बदलू शकला असता.
भारत आता ९ मार्चला दुबईमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनलच्या विजेत्याशी भिडणार आहे.