जन्मप्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी मालेगाव महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना अटक!

भाजपा नेते किरीट सोमय्यांची माहिती

जन्मप्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी मालेगाव महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना अटक!

मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर जन्म दाखला घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. यासंदर्भात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठवल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. तपासणी आणि चौकशी करत पोलिस अटक करत आहेत. याच दरम्यान, या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटकरत याबाबत माहिती दिली.

मालेगांव पोलिसांनी, महापालिका १०४४ जन्म प्रमाणपत्र घोटाळ्या प्रकरणी महापालिका प्रभाग अधिकारी फयाज आणि  लिपिक वाल्मिक खरे यांना अटक केली आहे. तसेच संशयित आरोपी सिराज याने खोटे बनावटी कागदपत्रद्वारे जन्मप्रमाणपत्र मिळवले म्हणून त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.  तसेच मालेगावातील आत्तापर्यंत ३९७७ जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. या घोटाळ्या प्रकरणी सुमारे ६० जणांना अटक करण्यात आली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. 

हे ही वाचा : 

कोर्टवर कोसळले जोकोविच!

शशी थरूर यांनी आणीबाणीच्या क्रूर काळाची करून दिली आठवण

भारत-मलेशिया व्यापार बैठकीत काय घडले ?

ठाकरे गटावर का भडकले उदय सामंत ?

दरम्यान, मालेगावमध्ये ३९७७ बांगलादेशींनी खोटे कागदपत्रे देऊन जन्म प्रमाणपत्र घेतले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर मालेगावातील छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. या प्रकरणी सखोल तपास सुरू असून पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान, जन्मप्रमाणपत्र घोटाळा प्रकरणाचा मुद्दा किरीट सोमय्या यांनी उचलून धरला आहे. यासंदर्भात राज्यातील अनेक महापालिका, तहसील कार्यालयांची तपासणी-चौकशी ते करत आहेत.
Exit mobile version