शाळा, महाविद्यालयाच्या १०० मीटरच्या परिसरात असणाऱ्या गुटखा, तंबाखू,सिगारेट विक्री करणाऱ्या पानटपऱ्यावर मुंबई पोलीस आणि मुंबई महानगर पालिकेने केलेल्या निष्कासनाची कारवाई केली.
जुलै महिन्यात करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण १४९७ पानटपऱ्या शाळा आणि महाविद्यालय परिसरातून हटविण्यात आल्या असल्याची माहिती मुंबई पोलीसांकडून देण्यात आली आहे.ही कारवाई मुख्यमंत्री यांच्या ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानांतर्गत करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते राज तिलक रोशन यांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाळा,महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात गुटखा, तसेच तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी घालण्यात आली असताना देखील शाळा,महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात सर्रासपणे तंबाखूजन्य पदार्थाची विक्री केली जात होती.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आणि मुंबई महानगर पालिकेकडून शाळा आणि महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
४८ चालींच्या लढतीनंतर प्रज्ञानंद-सेवियन बरोबरीत
कॉमनवेल्थचे पदकविजेते आता ‘हॉट सीट’वर!
राहुल गांधींच्या त्या विदेश दौऱ्यात कोण होते सोबत ? फोटो केला व्हायरल
साहित्य भारतीच्या ‘आषाढरंग’ने न्हाऊन निघाली कवीमने
मुंबई पोलीस आणि महानगर पालिकेने जुलै महिन्यात राबवलेल्या या कारवाईत शाळा आणि महाविद्यालय परिसरात असणाऱ्या १४९७ पानटपऱ्याचे निष्कासन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी दिली.
मुंबई पोलीस आणि महानगर पालिकेने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत दक्षिण मुंबईत १९९ , मध्य मुंबईत ४८०, पूर्व प्रादेशिक विभागात १७३,पश्चिम उपनगर आणि उत्तर प्रादेशिक विभागात ६४६ पान टपऱ्याचे निष्कासन करण्यात आले आहे.
