अभिनेता विजयला सीबीआयकडून आले बोलावणे!

करूर चेंगराचेंगरी मृत्यू प्रकरण; ४१ जणांचा झाला होता मृत्यू

अभिनेता विजयला सीबीआयकडून आले बोलावणे!

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने अभिनेते- राजकारणी आणि तमिलगा वेत्री कळघम (TVK) चे संस्थापक विजय यांना समन्स बजावले आहे. करूर चेंगराचेंगरी प्रकरणी १२ जानेवारीला हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. २७ सप्टेंबर २०२५ रोजी करूर जिल्ह्यातील वेलुस्वामीपुरम येथे टीव्हीकेच्या राजकीय रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान समर्थक मोठ्या संख्येने जमले असताना या घटनेत ४१ जणांचा मृत्यू झाला आणि डझनभर लोक जण जखमी झाले.

सुरुवातीला, तामिळनाडू सरकारने या घटनेच्या सीबीआय चौकशीला विरोध केला आणि त्याऐवजी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय असल्याचे सांगून राज्याने न्यायालयासमोर असा युक्तिवाद केला की, घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी पुरेशी आहे.

यानंतर करूर चेंगराचेंगरीच्या घटनेने “राष्ट्रीय विवेकाला हादरवून टाकले” आणि स्वतंत्र, निष्पक्ष चौकशीची आवश्यकता असल्याचे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे हस्तांतरित केला. एसआयटी चालू ठेवण्याची राज्याची विनंती मान्य करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आणि केंद्रीय एजन्सीला तपास हाती घेण्याची परवानगी दिली. पदभार स्वीकारल्यापासून सीबीआय कार्यक्रमासाठी दिलेल्या परवानग्या, गर्दी व्यवस्थापन उपाययोजना, पोलिस तैनाती आणि आपत्कालीन प्रतिसादाची तपासणी करत आहे, तसेच टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांचे आणि अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवत आहे.

हे ही वाचा..

“राज ठाकरेंनी पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केलाय!”

‘वीबी जीरामजी’ योजनेमुळे खुश झाले मजूर

शास्त्रीय भाषांच्या संवर्धन, प्रसारासाठी ५४ दुर्मिळ प्रकाशने

जेएनयूचे नाव बदलून ‘आझाद भगतसिंग विद्यापीठ’ करा

या प्रकरणात एजन्सीसमोर हजर झालेल्यांमध्ये टीव्हीकेचे राज्य सरचिटणीस बस्सी आनंद, संयुक्त सचिव निर्मल कुमार आणि आधाव अर्जुन आणि करूर पश्चिम जिल्हा सचिव मथियाझगन यांचा समावेश आहे. करूर चेंगराचेंगरीनंतर लगेचच, मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला राजकीय रॅली आणि सार्वजनिक सभांसाठी सुरक्षा प्रोटोकॉल सुधारण्यासाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) चा मसुदा तयार करून सादर करण्याचे निर्देश दिले.

Exit mobile version