अभिनेता सलमान खानला धमकीचे सत्र सुरुच आहे. या प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. याच मालिकेत आता बॉलीवूडचा किंग म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खानला देखील जीवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला आहे. अज्ञात व्यक्तीने ५० लाख रुपयांची मागणी केली अन्यथा नुकसान होईल अशी धमकी दिली. या प्रकरणी वांद्रे मधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक छत्तीसगढच्या रायपुरमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे.
हे ही वाचा :
‘मशिदींवरील भोंगे बेकायदेशीर, हिंदूंना जो कायदा तोच मुस्लीमांनाही’
‘उद्धव ठाकरे घरात नाहीतर लोकांच्या दारात शोभून दिसतात’
‘जम्मू-काश्मीर विधानसभेत हाणामारी, कलम ३७० चे बॅनर भाजपाने फाडले’
लोकसभेच्या पराभवानंतर भाजपाने केले मायक्रो मॅनेजमेन्ट!
रायपुरातील फैजान खान नावाच्या व्यक्तीने धमकीचा फोन केल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी फैजान खान नावाच्या व्यक्तीची चौकशी केली असता २ नोव्हेंबरला आपला फोन चोरीला गेल्याचा दावा त्याने केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, धमकीची माहिती मिळताच शाहरुख खानच्या निवासस्थानी पोलिसांची सुरक्षा व्यवस्था अलर्ट आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बेरीकेट्स देखील लावण्यात आले आहेत.
