मुंबईतील २००६च्या लोकल रेल्वे बॉम्बस्फोटातील सर्व १२ आरोपी निर्दोष

मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

मुंबईतील २००६च्या लोकल रेल्वे बॉम्बस्फोटातील सर्व १२ आरोपी निर्दोष

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी ११ जुलै २००६ मध्ये झालेल्या लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष घोषित केले. यापैकी पाच आरोपींना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली होती, तर उरलेल्या सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

न्यायालयाचे निरीक्षण:

पुरावे आणि तपासाच्या त्रुटी:

स्फोटक, नकाशे, बंदुका अशा वस्तूंचा जप्ती या खटल्यात महत्त्वाची ठरत नाही, कारण प्रॉसिक्युशन हे सिद्ध करू शकले नाही की, वापरलेला बॉम्ब नेमका कोणता होता. त्यामुळे तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

हे ही वाचा:

थरूर आता आमच्यासोबत नाहीत!

‘हरयाणातील प्रकरण लव्ह जिहाद असून देशासाठी घातक’

ओमान क्रिकेट संघाच्या उपप्रशिक्षकपदी सुलक्षण कुलकर्णी

चिनी बाजार न्यूझीलंडसाठी संधी निर्माण करतो

प्रकरणाचा इतिहास

११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरी रेल्वेमार्गावरील लोकल गाड्यांमध्ये ७ बॉम्बस्फोट  झाले. यामध्ये १८९ लोकांचा मृत्यू, तर ८२४ लोक जखमी झाले. याप्रकरणी MCOCA (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत तपास आणि खटला चालवण्यात आला.

अपील आणि पुढील सुनावणी

राज्य सरकारने फाशीच्या शिक्षेची पुष्टीसाठी उच्च न्यायालयात अपील दाखल केली. सर्व आरोपींनीही शिक्षा आणि दोषारोपाविरोधात अपील केले. २०१५ पासून प्रकरण प्रलंबित होते. २०२२ मध्ये सरकारने कोर्टाला सांगितले की, पुरावे खूप असल्याने सुनावणीसाठी किमान ५-६ महिने लागतील. जुलै २०२४ मध्ये विशेष खंडपीठ स्थापन करून रोज सुनावणी घेण्यास सुरुवात झाली.

कोणते वकील सहभागी होते?

Exit mobile version