२१ वर्षीय बांगलादेशी महिला आरोपी रुग्णालयातून पसार

महिला कॉन्स्टेबलच्या हाताला हिसडा देऊन पळाली

२१ वर्षीय बांगलादेशी महिला आरोपी रुग्णालयातून पसार

मुंबईतील जे.जे. रुग्णालयातून उपचारादरम्यान २१ वर्षीय बांगलादेशी महिला आरोपी पोलिसांना चकवून पसार झाली. तिचं नाव रुबिना इर्शाद शेख असं असून, ती अवैधरित्या भारतात वास्तव्यास असल्याच्या आरोपाखाली नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. तिला भायखळा महिला कारागृहात ठेवण्यात आलं होतं.

पोलिसांच्या माहितीनुसार, सर्दी, ताप, त्वचारोग आणि पाच महिन्यांची गर्भावस्था यामुळे रुबिनाला उपचारासाठी जे जे रुग्णालयात आणण्यात आलं होतं. तिच्यासोबत महिला पोलिस कॉन्स्टेबल काजल शिंदे होत्या.

मात्र, रुग्णालयातील गर्दीचा फायदा घेत, रुबिनाने कॉन्स्टेबलच्या हाताला झटका देत पळ काढला. या प्रकरणी कॉन्स्टेबल शिंदे यांनी जेजे मार्ग पोलिस ठाण्यात रुबिनाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २६२ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.

हे ही वाचा:

दोरी बांधत असताना कोसळून गोविंदाचा मृत्यू

गोरेगावमधील एकाच सोसायटीत चौथी आत्महत्या…

पाकिस्तानमध्ये महापुरात ३०० पेक्षा जास्त मृत !

कृष्णाने कंसाचा वध करून प्रस्थापित केली लोकशाही

रुबिना शेखवर यापूर्वीच भारतीय न्याय संहिता, पासपोर्ट कायदा आणि परदेशी नागरिक कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. ५ ऑगस्ट रोजी वाशी पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. सध्या पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Exit mobile version