वरळीत बेस्ट बसखाली आल्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

चालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

वरळीत बेस्ट बसखाली आल्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

वरळी परिसरात झालेल्या भीषण अपघातात बेस्ट बसखाली आल्याने १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी सायंकाळी घडली. या प्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी बेस्ट बस चालकाविरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणाचे नाव अदनान इजाज शेख (१८) असे असून तो गिरगाव येथील भावन्स कॉलेजमध्ये प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तो केतन पापन यांच्या फ्लेक्स प्रिंटिंग दुकानात अर्धवेळ काम करत होता.

हा अपघात शनिवारी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता वरळीतील डॉ. ई. मोझेस रोडवरील ख्रिश्चन स्मशानभूमी परिसरात झाला. कामावरून घरी परतताना अदनान आपल्या दुचाकीवरून जात असताना एका बेस्ट बसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे दुचाकी घसरून अदनान रस्त्यावर फेकला गेला आणि तो बसच्या चाकाखाली सापडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली.

हे ही वाचा:

नूर बी बनली माही कश्यप, व्हीडिओ झाला व्हायरल

अमेरिका- फ्रान्स टॅरिफ युद्ध: फ्रेंच वाइनवर २०० टक्के टॅरिफ लावणार

“आम्ही नोबेल पुरस्कार देत नाही” नॉर्वेच्या पंतप्रधानांनी हात झटकले

फडणवीस म्हणाले, तिसऱ्या मुंबईसाठी भरघोस गुंतवणूक येईल!

स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्याला नायर रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर बस चालक अजित बाळू खोत यानेच जखमी अदनानला रुग्णालयात नेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
मृत अदनानची आई लक्ष्मी येल्लप्पा गोल्हार उर्फ अदिबा इजाज शेख, या वरळीतील गांधी नगर, दैनिक शिवनेरी मार्ग येथील शिवगणेश इमारतीत राहतात व त्या घरकाम करून उदरनिर्वाह करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी बस चालकाविरोधात निष्काळजी वाहनचालना केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version