तृणमूल नेत्याविरुद्धच्या प्रमुख साक्षीदाराच्या गाडीचा अपघात; संशय व्यक्त

ट्रकने दिलेल्या धडकेत गाडीतील चालकासह मुलाचा मृत्यू तर, वडील जखमी

तृणमूल नेत्याविरुद्धच्या प्रमुख साक्षीदाराच्या गाडीचा अपघात; संशय व्यक्त

पश्चिम बंगालच्या संदेशखली येथे २०२४ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या आणि निलंबित तृणमूल काँग्रेसचा प्रमुख नेता शाहजहान शेखविरुद्धच्या प्रमुख साक्षीदाराचा मुलगा बुधवारी न्यायालयात जाताना अपघातात ठार झाला.

बोयारमारीजवळील बसंती महामार्गावर झालेल्या या अपघातात साक्षीदार भोला घोष आणि त्यांच्या मुलाला न्यायालयात घेऊन जाणाऱ्या खाजगी कारची आणि एका ट्रकची समोरासमोर धडक झाली. भोला यांचा मुलगा सत्यजित घोष आणि कारचा चालक शहानूर मोल्ला यांचा जागीच मृत्यू झाला. ते दोघे एका वेगळ्या खटल्याच्या सुनावणीसाठी बशीरहाट उपविभागीय न्यायालयात जात असताना हा अपघात झाला. या अपघातामुळे काहीतरी गडबड असल्याचा संशय निर्माण झाला होत असून अपघाताच्या परिस्थितीची सखोल सीबीआय चौकशी करण्याची मागणी होत आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रकने खाजगी वाहनाला ढकलत रस्त्यालगत असलेल्या एका पाण्याच्या टाकीत टाकले. घटनास्थळी ट्रक महामार्गाच्या कडेला पाण्याच्या टाकीवर धोकादायकपणे अधांतरी असल्याचे दिसून आले. दरम्यान, ट्रकचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. जखमी घोषला प्रथम स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, अशी माहिती बशीरहाटचे पोलिस अधीक्षक हुसेन मेहेदी रहमान यांनी दिली. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात पाठवण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

कोणालाही ‘वंदे मातरम’ गाण्यात आपत्ति असू नये

राहुल गांधीच्या परदेश दौर्‍यावर काय म्हणाले कुशवाह ?

सीबीआयकडून ३० आरोपींसह दोन चिनी नागरिकांविरुद्ध आरोपपत्र

भावाने दोन निष्पाप मुलांचा घेतला जीव

घोष यांचा मोठा मुलगा, विश्वजित, याने दावा केला की हा त्याच्या वडिलांच्या हत्येचा नियोजित प्रयत्न होता आणि शाहजहानने तुरुंगात बसून हा गुन्हा घडवून आणल्याचा आरोप केला. घोष, त्यांच्या मुलासह, शाहजहानने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अनेक खटल्यांपैकी एकाच्या संदर्भात हजर राहण्यासाठी बशीरहाट उपविभागीय न्यायालयात जात होते. स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी असा दावा केला की, कारच्या विरुद्ध दिशेने जाणारा ट्रक, वाहनाला वेगाने धडकला, वाहनाला चिरडले आणि जवळच्या पाण्याच्या टाकीत पडेपर्यंत ढकलत नेले.

Exit mobile version