प्रेक्षकांचे कपडे फाडणाऱ्या आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेक्षकांचे कपडे फाडणाऱ्या आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

हर हर महादेव चित्रपटाबद्दल संभाजी राजे यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर या वादात राष्ट्रवादी काँग्रेनेही उडी मारली आहे. यादरम्यान, ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना चित्रपटगृहात घुसून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढलं. याप्रकरणी आव्हाड यांच्या शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात घुसून जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना बाहेर काढलं. यावेळी तेथील मॅनेजर आणि प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाली. या मारहाणीत एका प्रेक्षकाचे कपडे फाडल्याचे दृश्य कॅमेरामध्ये कैद झालं आहे. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी विवियाना मॉल गाठलं आणि चित्रपटाचा शो पुन्हा सुरू केला. यावेळी अविनाश जाधव यांनी शो बंद करुन दाखवा, असे थेट आव्हान आव्हाडांना दिले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या शंभर कार्यकर्त्यांवर वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १४१, १४३, १४६, १४९, ३२३ आणि ५०४ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ३७/१३५ आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

सुधा मूर्ती संभाजी भिडेंना भेटल्या आणि…

रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर गुन्हा दाखल

भारत जोडोसाठी KGF-2 जोडो पडले महागातं

सत्तारांचे समर्थन नाही, पण महाराष्ट्रात सिलेक्टिव्हपणा केला जातो

दरम्यान, आज कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सध्या १५ ते २० पोलीस कर्मचारी विवियाना मॉल परिसरात तैनात आहेत.

Exit mobile version