28 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरक्राईमनामारिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर गुन्हा दाखल

रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर गुन्हा दाखल

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

Google News Follow

Related

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम ४२० अन्वये दापोली पोलिसांनी परब यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

दापोली पोलीस ठाण्यात रुपा दिघे यांनी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी अनिल परब, सुरेश तुपे आणि अनंत कोळी यांच्याविरोधात भादंवि ३४ आणि ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पर्यावरण मंत्रालय भारत सरकारने जानेवारी महिन्यात साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. ९० दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, ९० दिवस पूर्ण झाल्यानंतरही रिसॉर्ट पाडण्यात आले नव्हते. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. जिल्हाधिकारी कार्यलयाकडून रिसॉर्ट पाडण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या रिसॉर्टचे पाडकाम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. त्याआधीच अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री १२ वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा:

भारत जोडोसाठी KGF-2 जोडो पडले महागातं

सत्तारांचे समर्थन नाही, पण महाराष्ट्रात सिलेक्टिव्हपणा केला जातो

नीलमताई गॅरेण्टी उद्धव ठाकरे यांची तरी आहे का?

अरबी भाषा शिक्षकाकडून ८ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून, परब यांनी पर्यावरनाच्या नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केले. त्याशिवाय, हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी अनिल परबांवर केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,950चाहतेआवड दर्शवा
1,977अनुयायीअनुकरण करा
52,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा