29 C
Mumbai
Tuesday, October 3, 2023
घरक्राईमनामाचार वर्षात दाऊदने भारतात पाठवले १३ करोड

चार वर्षात दाऊदने भारतात पाठवले १३ करोड

Google News Follow

Related

राष्ट्रीय तपास यंत्रणेने टेरर फंडिंगबाबत मोठा खुलासा केला आहे. फरारी गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याचा जवळचा साथीदार छोटा शकीलने मुंबईत दहशतवादी कारवाया आणि मोठ्या खळबळजनक घटना घडवण्यासाठी दुबईमार्गे पाकिस्तानातून २५ लाख रुपये रोख पाठवले, असे एनआयएने आपल्या आरोपपत्रात नमूद केलं आहे. तसेच, चार वर्षात हवालाद्वारे दहशतवादी फंडिंगसाठी सुमारे १२ ते १३ कोटी रुपये भारतात पाठवले गेले असल्याचेही आरोपपत्रात म्हटले आहे.

एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, पाकिस्तानमधून भारतात आणलेले २५ लाख रुपये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाठवण्यात आले होते. एनआयएने दावा केला आहे की शब्बीरने पाच लाख रुपये ठेवले होते आणि उर्वरित रक्कम एका साक्षीदारासमोर आरिफला दिली होती. एनआयएने ९ मे २०२२ रोजी शब्बीरच्या घराच्या झडतीदरम्यान पाच लाख रुपये जप्त केले होते. तसेच चार वर्षात दहशदवादी फंडिंगसाठी सुमारे १२ ते १३ कोटी रुपये भारतात पाठवले असल्याचाही खुलासा एनआयएने केला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृतानुसार, जागतिक दहशतवादी नेटवर्क आणि डी कंपनीद्वारे चालवल्या जाणार्‍या संघटित गुन्हेगारी सिंडिकेटशी संबंधित प्रकरणात, शब्बीरने २९ एप्रिल रोजी आरिफच्या सांगण्यावरून मालाड (पूर्व) येथील हवाला ऑपरेटरकडून दहशतवादी कारवाया करण्यासाठी ही रक्कम मिळवली होती. चार वर्षांत सुमारे १२ ते १३ कोटी रुपये हवाला व्यवहारांद्वारे ‘विटनेस 6’ मार्फत पाठवले गेले आहेत. तसेच साक्षीदार हा सुरतचा हवाला ऑपरेटर आहे ज्याची ओळख सुरक्षिततेच्या कारणांमुळे संरक्षित आहे.

हे ही वाचा:

रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर गुन्हा दाखल

भारत जोडोसाठी KGF-2 जोडो पडले महागातं

सत्तारांचे समर्थन नाही, पण महाराष्ट्रात सिलेक्टिव्हपणा केला जातो

नीलमताई गॅरेण्टी उद्धव ठाकरे यांची तरी आहे का?

तपासादरम्यान असेही उघड झाले आहे की, रशीद मारफानी उर्फ ​​रशीद भाई हा दुबईतील वाँटेड गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांना हवाला मनी ट्रान्सफर काम भारतात पाठवत असे. एनआयएच्या आरोपपत्रात दाऊद, शकील, त्याचा मेहुणा सलीम फल, आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांची नावे आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
102,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा