31 C
Mumbai
Friday, June 12, 2026
घरक्राईमनामापुण्यातून १.३६ कोटी रुपयांची संशयित बनावट दारू जप्त

पुण्यातून १.३६ कोटी रुपयांची संशयित बनावट दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आंतरजिल्हा तस्करी रॅकेटचा केला पर्दाफाश

Google News Follow

Related

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागाने मोठी कारवाई केली आहे. सुमारे १.३६ कोटी रुपये किमतीची संशयित बनावट भारतीय निर्मित विदेशी मद्य (IMFL) जप्त केली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या कारवाईत बनावट लेबल आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे चालविल्या जाणाऱ्या आंतरजिल्हा तस्करीच्या रॅकेटचाही पर्दाफाश झाला आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख पप्पू लाल भीखाराम बिश्नोई (वय ३४), रा. बाडमेर, राजस्थान अशी झाली आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ अंतर्गत कलम ६५ (अ) (ई), ८०, ८३, ८६, ९० आणि १०८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विभागाच्या पथकाने हवेली तालुक्यातील पाषाण येथील सुतारवाडी परिसरात पुणे-मुंबई महामार्गावर NL-01-N-5267 क्रमांकाचा कंटेनर ट्रक अडवला. तपासणीदरम्यान वाहनातून “रॉयल सिलेक्ट डिलक्स व्हिस्की” या ब्रँडच्या दारूचे १,२०० बॉक्स जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात असे समोर आले की, ही दारू गोव्यात तयार करण्यात आली होती. मात्र, त्यावर अशा प्रकारची बनावट लेबले लावण्यात आली होती की ती दारू मध्य प्रदेशात उत्पादित झाली असून तिची विक्रीही मध्य प्रदेशात होणार असल्याचे दर्शविले जात होते. वाहनातून १८० मिलीलीटरच्या बाटल्यांमधील एकूण १०,३६८ बल्क लिटर दारू जप्त करण्यात आली.

हे ही वाचा:

हॉर्मुझ सामुद्रधुनी जवळील १८ हजार भारतीय खलाशांना हाय अलर्ट

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यास इराणची तयारी

केईएम रुग्णालय करणार डॉ. सेजल पवारची चौकशी, केले होते आक्षेपार्ह वक्तव्य

NEET च्या उमेदवारांना मिळणार अतिरिक्त १५ मिनिटे

अधिकाऱ्यांनी सांगितले की, चालकाकडे या मालवाहतुकीसाठी कोणतेही वैध परवाना पत्र नव्हते. त्याऐवजी त्याने कथितपणे बनावट करचलन (टॅक्स इनव्हॉइस) आणि खोटी कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांमध्ये ट्रकमध्ये रिकामे कंट्रोल पॅनल बॉक्स वाहून नेले जात असल्याचा दावा करण्यात आला होता. या दस्तावेजांचीही सखोल चौकशी सुरू आहे. या कारवाईत सुमारे १.२० कोटी रुपये किमतीची दारू, १५ लाख रुपये किमतीचा कंटेनर ट्रक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मालमत्तेची एकूण किंमत १ कोटी ३५ लाख ९९ हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.

उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले की, जप्त करण्यात आलेल्या दारूचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून संपूर्ण साठा प्रत्यक्षात बनावट होता की नाही, याचीही तपासणी केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
314,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा