नुपूर शर्माविरोधातील आंदोलनात लहान मुलांनाही ओढले

नुपूर शर्माविरोधातील आंदोलनात लहान मुलांनाही ओढले

नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अजूनही देशभरात मुस्लिमांकडून आंदोलने सुरू आहेत. त्यात दगडफेक, जाळपोळ, गोळीबार, पेट्रोल बॉम्बचा सर्रास वापर यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सगळ्या हिंसक आंदोलनांमध्ये मुस्लिम तरुणांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. पण या आंदोलनांमध्ये लहान मुलांनाही ओढले जात असल्याचे दिसू लागले आहे.

यासंदर्भात एक व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यात नुपूर शर्मांना अटक करा असे पोस्टर्स रस्त्यावर टाकण्यात आल्याचे दिसते. त्या पोस्टर्सवर ८ ते १० वर्षांची मुले लघवी करताना दिसत आहेत. शिवाय, त्या मुलांना असे करण्यास कुणीतरी उचकावत असल्याचेही स्पष्ट होते आहे. या मुलांना लघवी करण्यास सांगून त्याचा व्हीडिओ करण्यात आला आहे. यावरून लहान मुलांनाही या प्रकारात ओढण्याचा प्रकार पुढे आला आहे. या मुलांपैकी एक मुलगा या पोस्टरवर दगडही भिरकावत आहे. मधले बोट वर करून काही मुले मोबाईल कॅमेऱ्याकडे दाखवत आहेत.

मागे सीएए आंदोलनाच्या वेळी अशाच लहान मुलांना आंदोलनात उतरविण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द, आक्षेपार्ह अशी विधाने करण्यास या लहान मुलांना सांगण्यात आले होते. या सगळ्या प्रकारातून लहान मुलांमध्ये त्या वयातच विष पेरण्याचे काम या आंदोलनाच्या मागे असलेली काही मंडळी करत असल्याचे दिसते आहे. या लहान मुलांच्या पालकांना हे माहीत असतानाही ते या मुलांना शिक्षणाऐवजी असे करण्यास कसे काय प्रवृत्त करत असतील याविषयी आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा द्या’

‘आमदार सांभाळता न येणं याला संजय राऊत जबाबदार’

शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीचा उमेदवार असता तर निवडून आला असता!

‘अपक्ष आमदारांचं नाव घोषित करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन’

 

लहान मुलांप्रमाणेच या आंदोलनांमध्ये मुस्लिम समाजातील अनेक तरुणही सहभागी आहेत. त्यांच्याकडून तुफान दगडफेक, जाळपोळ अशा घटना घडत असल्याचे दिसते आहे.  अशा अनेक तरुणांना कानपूर, प्रयागराज, रांची वगैरे ठिकाणी झालेल्या दंगलींतून अटक करण्यात आली आहे. आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Exit mobile version