मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराला सायबर भामट्यांनी आपले सावज बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रारदार पोलीस हवालदार निवडणूक बंदोबस्तात व्यस्त असताना, त्यांच्या बँक खात्यावरून अज्ञात व्यक्तीने संमतीशिवाय ४,१२,०४५ रुपयांचे वैयक्तिक कर्ज मंजूर करून घेऊन ती रक्कम दुसऱ्या खात्यात वळती केली आहे.
नवघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार प्रदिप महादेव वाडेकर हे १६ जानेवारी २०२६ रोजी महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणी बंदोबस्तासाठी मुलुंड येथे तैनात होते. दुपारी १२:३० च्या सुमारास त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांना कळवले की, त्यांचा फोन दिल्लीला डायवर्ट झाला असून त्यावर एका अनोळखी व्यक्तीचा आवाज येत आहे. वाडेकर यांनी त्यांचा मोबाईल तपासला असता, त्यांना एचडीएफसी बँकेशी संबंधित अनेक संशयास्पद मेसेज आलेले दिसले. त्यांनी तातडीने बँकेत जाऊन चौकशी केली असता, त्यांच्या नावावर ४,१२,०४५ रुपयांचे पर्सनल लोन मंजूर झाले असून ती संपूर्ण रक्कम मनिष कुमार नावाच्या व्यक्तीच्या ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’ खात्यात तीन व्यवहारांद्वारे वळती झाल्याचे उघड झाले.
हे ही वाचा :
भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात सोने, चांदी चमकली!
अमेरिका- इराणमध्ये युद्धाचा भडका उडणार?
“पाकिस्तानचा एकमेव अजेंडा म्हणजे भारताला नुकसान पोहोचवणे”
यशस्वी भारत जगाला अधिक स्थिर, समृद्ध आणि सुरक्षित करतो!
अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल तक्रारदार माहितीनुसार, त्यांनी कोणत्याही कर्जासाठी अर्ज केला नव्हता किंवा कोणतीही प्रक्रिया केली नव्हती. सायबर भामट्याने तांत्रिक फेरफार करून वाडेकर यांचा फोन नंबर डायवर्ट केला आणि त्यांच्या संमतीशिवाय हे कर्ज मंजूर करून घेतले.
