मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने (एएनसी) अटक केलेल्या डी-गँगशी संबंधित ड्रग्ज माफिया सलीम डोलाचा विश्वासू साथीदार मोहम्मद सलीम सुहेल शेख याने पोलिस चौकशीदरम्यान एक धक्कादायक खुलासा केला आहे. शेखने चौकशीत सांगितले की, तो सलीम डोलाच्या आदेशानुसार दुबई आणि देशातील विविध ठिकाणी भव्य ड्रग्ज पार्ट्या आयोजित करत असे.
या पार्ट्यांमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावल्याचेही त्याने कबूल केले आहे. शेखने चौकशीत श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, दिवंगत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी, हसीना पारकर यांचा मुलगा अलीशाह पारकर, प्रसिद्ध डीजे ओरी उर्फ ओरहान, तसेच निर्माता-दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांसह अनेक नामांकित व्यक्तींची नावे उघड केली आहेत.
हे ही वाचा:
ते मीनार भारतीयांवर कोसळतील… मनातले मांडे मनातच राहीले
सुमेध वडावाला लिखित ‘कार्यकर्ता’ आत्मकथेला पुरस्कार
राजकीय पक्षांच्या वाढत्या दबावानंतर युनूस यांच्याकडून निवडणुकीची घोषणा
“भारतीय क्रिकेटचा पहिला तुफानी कप्तान—सी.के. नायडू!”
शेख स्वतःही या पार्ट्यांमध्ये सहभागी होत ड्रग्ज पुरवत असल्याचे सांगितले. या खुलाशानंतर गुन्हे शाखेने या सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलावण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच या ड्रग्ज पार्ट्यांमध्ये आंतरराष्ट्रीय तस्करांचा सहभाग होता का आणि या पार्ट्यांमागील आर्थिक स्रोत कोणते होते, याचाही तपास सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात ड्रग्ज तस्करीबरोबरच हवाला व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांचेही धागेदोरे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
