ग्रेटा टूलकिट प्रकरणात झाली पहिली अटक! अटक झालेली दिशा रवी आहे तरी कोण?

ग्रेटा टूलकिट प्रकरणात झाली पहिली अटक! अटक झालेली दिशा रवी आहे तरी कोण?

ग्रेटा थनबर्ग हिने ट्विटरवर शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक टूलकिट चुकून शेअर करत या आंदोलना मागच्या ,आंतराष्ट्रीय कटाचा पर्दाफाश केला. याच टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कारवाई करताना पहिली अटक केली आहे. दिशा रवी असे अटक झालेल्या तरुणीचे नाव असून ती बंगलोरची रहिवासी आहे.

ग्रेटा थनबर्ग हिने ट्विटरवर अनवधानाने शेअर केलेल्या टूलकिटवरून दिल्ली पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात आता अटकसत्र सुरु झाले असून दिशा रवी या पहिल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या हिंसाचाराचा आणि या टूलकिटचा संबंध असण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

काँग्रेस मंत्र्याची जीभ घसरली! साधूंना म्हणाले नालायक

कोण आहे दिशा रवी?
२१ वर्षीय दिशा रवी ही मूळची बंगलोरची रहिवासी आहे. ती पर्यावरण चळवळीतील एक तरुण कार्यकर्ती असून, ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ या संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. ती माऊंट कार्मेल या प्रतिष्ठित महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने हे टूलकिट एडिट करून प्रसारित केल्याचा संशय आहे.

३ फेब्रुवारी रोजी पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा हिने शेतकरी आंदोलन विषयी ट्विट केले असून नंतर चुकून तिने हे टूलकिट आपल्या ट्विटरवर टाकले होते. नंतर हे टूलकिट डिलीट करण्यात आले असले तरीही या टूलकिट मधल्या अनेक आक्षेपार्ह गोष्टी लक्षात घेऊनच या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या टूलकिट प्रकरणाच्या तपासात गूगल दिल्ली पोलिसांचे सहकार्य करणार आहे.

Exit mobile version