कोंडाईबारी घाटात धुळे-सुरत बस दोन ट्रकमध्ये घुसली, सात प्रवासी जखमी

उतारावर ओव्हरटेक करतांना अपघात

कोंडाईबारी घाटात धुळे-सुरत बस दोन ट्रकमध्ये घुसली, सात प्रवासी जखमी

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या खासगी बसला झालेल्या अपघाताची घटने ताजी असतानांच आता नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात बसला भीषण अपघात झाला आहे. घाटात धुळे – सुरत बस दोन ट्रकला जाऊन जोरदार धडकल्याने सात प्रवासी जखमी झाले. सकाळी सडे दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात बसमधील चार प्रवाशांसह दोन बालके जखमी झाली आहेत.

साक्री डेपोची ही धुळे-सुरत बस धुळ्याहून सुरतकडे जात होती. या बसमधून एकूण ४२ प्रवासी प्रवास करत होते. कोंडाईबारी  घाटात उतारावर ओव्हरटेक करतांना हा अपघात झाला. ओव्हरटेक करत असतांना ही बस थेट ट्रक व कंटेनर मध्ये जाऊन घुसली. धडक दिल्यामुळे बसच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघात झाल्यानंतर महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले . महामार्ग पोलिसांनी जखमींना खाजगी वाहनातून रूग्णालयात दाखल केले. अपघातातील सात जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर रुग्णांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

देशात कोविडचे १०,०९३ नवे रूग्ण, तरीही किंचित घट

राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी

काँग्रेसला ना उद्धवजींच्या मानाची चिंता, ना मानेची

शरद पवार आता नेमकं काय करतील?

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सध्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे दहिवेल ते नवापूर दरम्यानचा प्रवास अडचणीचा ठरत आहे. कोंडाईबारी घाटात महामार्गाचे एकतर्फी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये सुरत आणि धुळ्याच्या प्रवाशांचा समावेश आहे. सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

Exit mobile version