दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास पुढे सरकत असताना या प्रकरणी नवनवे खुलासे होत आहेत. दिल्ली बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी डॉ. उमर नबी याने आपल्या बुटांचा वापर करून बॉम्ब सक्रिय केल्याचे तपासात उघड झाले आहे. माहितीनुसार, आत्मघाती बॉम्बर डॉ. उमर नबी याने स्फोट घडवून आणताना “शू बॉम्बर”चा वापर करून स्फोट घडवण्याचे काम केले असावे. तपास यंत्रणेला घटनास्थळी फॉरेन्सिक पुरावे सापडले आहेत जे उमरने “शू बॉम्ब” वापरल्याचे सिद्ध करतात. ज्या आय-२० कारमध्ये स्फोट झाला त्या कारमध्ये तपास यंत्रणेला शूज सापडले आहेत.
तपास पथकाला कारच्या उजव्या पुढच्या टायरजवळ ड्रायव्हरच्या सीटखाली एक बूट सापडला. बूटाच्या आत एक धातूचा पदार्थ आहे. आतापर्यंतच्या तपासाच्या आधारे, असे मानले जाते की याचा वापर स्फोट घडवण्यासाठी करण्यात आला होता. टायर आणि बूट दोन्हीवर संवेदनशील स्फोटक TATP चे ट्रेस आढळून आले आहेत, ज्यामुळे उमरने स्फोट घडवण्यासाठी त्याच्या बूटमध्ये काहीतरी यंत्रणा लपवली असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तपास पथकांनी अशीही पुष्टी केली आहे की, दहशतवाद्यांनी मोठ्या हल्ल्यासाठी मोठ्या प्रमाणात TATP चा साठा केला होता आणि लाल किल्ल्यावरील स्फोटात TATP आणि अमोनियम नायट्रेटचे मिश्रण होते. कारच्या मागच्या सीटखाली सापडलेल्या पुराव्यांवरून अतिरिक्त स्फोटक पदार्थ असल्याचे दिसून येते.
हेही वाचा..
बलुच बंडखोरांनी रेल्वे ट्रॅकवरच लावली स्फोटकं, जीवितहानी नाही
माई-बहिण सन्मान योजना आधी घरातून सुरु करा
बंगालमधील एसआयआरमुळे घुसखोर बांगलादेशात पळू लागलेत!
डिजिटल अरेस्ट दाखवून महिलेचे ३२ कोटी लुटले
१० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एक मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला आणि २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले. डॉ. उमर नबी याने आत्मघाती हा हल्ला केला. फरीदाबाद मॉडेल नावाच्या एका संपूर्ण दहशतवादी टोळीचा या हल्ल्यामागे हात होता, असे स्पष्ट झाले असून या दहशतवादी मॉड्यूलमध्ये काम करणाऱ्या अनेक डॉक्टरांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
