दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी अल- फलाह विद्यापीठातील शिक्षक डॉ. मुझम्मिल शकील याला अटक केली होती. त्यानंतर, डॉ. उमर उन नबी या आत्मघातकी बॉम्बरने दिल्लीत स्फोट घडवला. अशातच तपास यंत्रणांनी आता डॉ. मुझम्मिल शकील याच्याशी संबंधित धक्कादायक खुलासा केला आहे.
अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित डॉ. मुझम्मिल याने दहशतवादी साहित्य बनवण्यासाठी पिठाच्या गिरणीचे बॉम्ब बनवण्याच्या यंत्रात रूपांतर केले होते. फरिदाबादमधील एका घरातून हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. माहितीनुसार, मुझम्मिल स्फोटकांसाठी रसायने तयार करण्यासाठी पिठाच्या गिरणीचा वापर करत असे. पिठाच्या गिरणीचे, ग्राइंडरचे आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे फोटोही समोर आले आहेत. या वस्तू एका टॅक्सी चालकाच्या घरातून जप्त करण्यात आल्या आहेत. मुझम्मिलने युरिया दळण्यासाठी आणि रसायने तयार करण्यासाठी पीठ गिरणीचा वापर केला होता.
एनआयएच्या पथकाने टॅक्सी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चालकाने सांगितले की, तो चार वर्षांपूर्वी त्याच्या मुलाला उपचारासाठी अल- फलाह मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन जात असताना मुझम्मिलला पहिल्यांदा भेटला होता. पुढील तपास आता एनआयए करत आहे.
हे ही वाचा:
देशभरातील घुसखोरांना शोधून हाकलणार!
जगातील प्रत्येक पाच आयफोनपैकी एक आयफोन तयार होतो भारतात
“बेंगळुरूच्या रहदारीतून प्रवास करण्यापेक्षा अंतराळात प्रवास करणे सोपे”
भारताचे अन्नधान्य उत्पादनाची गरुडझेप
दिल्ली कार बॉम्बस्फोटातील सह-आरोपी डॉ. मुझम्मिलने फरीदाबादच्या धौज गावातील एका घरात पिठाच्या गिरणीचे रासायनिक कार्यशाळेत रूपांतर केले होते हे आता समोर आले आहे. हरियाणातील फरीदाबाद येथील एका टॅक्सी चालकाच्या घरातून जप्त केलेल्या पिठाच्या गिरणीचे आणि इलेक्ट्रिकल मशिनरीचे फोटो पाहता, धान्य दळण्याचे यंत्र रासायनिक पावडर बनवण्याच्या उपकरणात कसे रूपांतरित केले जात होते हे दिसून आले आहे.
