उच्चशिक्षित, प्रतिष्ठित आता दहशतवादी कृत्यात आघाडीवर

सुरक्षा यंत्रणांपुढे नवे आव्हान

उच्चशिक्षित, प्रतिष्ठित आता दहशतवादी कृत्यात आघाडीवर
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळच्या वर्दळीच्या भागात झालेल्या भीषण स्फोटाने राजधानी हादरली आहे. तेरा जणांचा मृत्यू आणि अनेक जखमींनी भरलेल्या या घटनेने देशाच्या सुरक्षेविषयी नवी चिंता निर्माण केली आहे. सरकारने तात्काळ सजग आणि खंबीर भूमिका घेतली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सखोल तपासाचे आदेश देत, “या षडयंत्राच्या मुळापर्यंत पोहोचल्याशिवाय विश्रांती नाही,” असा स्पष्ट इशारा दिला आहे.तपास यंत्रणांच्या प्राथमिक आढाव्यातून दोन गंभीर संकेत समोर आले आहेत — एक म्हणजे, गेल्या काही वर्षांत थंडावलेले स्थानिक पातळीवरून घडवले जाणारे इस्लामी दहशतवादी हल्ले पुन्हा सक्रिय होत आहेत. दुसरे म्हणजे, आता हे हल्ले राबवण्यासाठी डॉक्टरांसारख्या उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित व्यावसायिकांचा वापर करण्यात येत आहे. अशा ‘व्हाईट कॉलर’ दहशतवादाची प्रवृत्ती भारतासाठी धोकादायक व चिंताजनक आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. नागरिकांनीही सावध राहून संशयास्पद हालचालींची माहिती तत्काळ देणे, हेच आजच्या परिस्थितीत राष्ट्रसेवेचे सर्वात जबाबदार रूप ठरेल.

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळच्या सिग्नलवर थांबलेल्या ह्युंदाई आय२० गाडीत १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६:५० वाजता मोठा स्फोट झाला. गेल्या काही दशकांमध्ये या स्फोटात दहा लोकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तपास करणाऱ्या यंत्रणांनी या घटनेला दहशतवादी हल्ला म्हणलेले नाही. तथापि, या प्रकरणात बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, २०१९ (UAPA) हा सहसा दहशतवादाच्या विरोधात वापरला जाणारा कायदा लावला आहे.ही घटना फरीदाबाद येथे पोलिसांनी श्रीनगर आणि लखनऊपर्यंत पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कमधील तीन डॉक्टरांसह आठ लोकांना पकडून सुमारे २,९०० किलो स्फोटके जप्त केल्यानंतर काही तासांतच घडली. गेल्या काही दिवसात काश्मीर, उत्तर प्रदेश, हरयाणा, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधे पोलिसांनी इस्लामिक स्टेट आणि जैश ए मोहमद यासारख्या दहशतवादी संघटनांची मोड्यूल उघडकीस आणली आहेत हे देखील विशेष नमूद करण्यासारखे आहे. त्यामुळेच या स्फोटानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी तसेच तपास यंत्रणांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत.

हे ही वाचा:

“पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल” पाक संरक्षण मंत्री असे का म्हणाले?

१९ ऑक्टोबरलाच लीड मिळाला होता…सिंदूर २.० चे संकेत; अल फलाहचा चेअरमनच दाखलेबाज

दिल्लीतील स्फोटाच्या कटात सहभागी असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घ्या!

ईडन गार्डन्सवर इतिहास घडणार!

कारचा पुलवामा आणि फरिदाबादशी संबंध हा केवळ योगायोग?

दिल्ली येथे ज्या कारमध्ये स्फोट झाला ती कार उमर महमूद नावाचा तरुण डॉक्टर चालवत होता, असे तपासात निष्पन्न झाले असल्याचे वृत्त आहे. मूळ काश्मीरमधील पुलवामाचा असलेला उमर महमूद फरिदाबाद येथील अल-फराह मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक होता. सोमवारी फरिदाबाद येथे उघडकीस आणलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गझवा-उल-हिंदच्या नेटवर्कचे म्होरके असलेल्या डॉ. आदिल अहमद राथर आणि डॉ. मुझम्मिल शकील यांच्याशी त्याचा काही संबंध होता काय याबाबत तपास सुरु आहे.

गेल्या चोवीस तासात तपास यंत्रणांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली असता, स्फोटापूर्वी संबंधित कार लाला किल्ल्याच्या पार्किंगमध्ये तीन तास उभी होती आणि तो संपूर्ण काळ उमर महमूद कारमध्येच बसून राहिला होता असे निष्पन्न झाले असल्याचे वृत्त एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने दिले आहे.

एनडीटीव्ही वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, स्फोट झाला ती कार मार्च महिन्यापासून अनेकदा विकली गेली होती. गुरुग्राम येथे राहणाऱ्या सलमान नावाच्या व्यक्तीने ती गाडी मार्च २०२५ मध्ये ओखला येथील देवेंदर नावाच्या व्यक्तीला विकली होती. त्यानंतर, देवेंदरने ती गाडी अंबाला येथील एका व्यक्तीला विकली. अंबाला येथून त्या कारची पुलवामा येथे पुन्हा विक्री झाली.

स्थानिक लोकांना वापरून बॉम्बस्फोट घडवण्याची कार्यपद्धती पुन्हा वापरात?

१९९२ साली मुंबई येथे साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यानंतरच्या काळात राजधानी दिल्ली, भारताची आर्थिक राजधानी मुंबई यासह देशभरातील अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. या बॉम्बस्फोटांमध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पडले. २०१४ पासून देशात खोलवर वसलेल्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट झालेले नाहीत. सीमावर्ती राज्यांमधील घुसखोरी आणि सीमापार दहशतवादाच्या घटनांच्या प्रमाणात सर्जिकल स्ट्राईक्स आणि ऑपरेशन सिंदुरानंतर मोठी घट झाली आहे. जंगल भागातील अतिडाव्या दहशतवादाला देखील केंद्र सरकारने राज्य सरकारांच्या सहकार्याने केलेल्या कारवाईमुळे आळा बसला असून नक्षलवादी दहशतीचा अंत दृष्टीक्षेपात येत आहे.

सन्मानित पेशातील लब्धप्रतिष्ठित लोकांना पुढे करण्याचे धोरण?

अशा परिस्थितीत भारतात अशांतता माजवण्यात रस असलेल्या परकीय शक्तींनी स्वतः नामानिराळे राहून स्थानिक लोकांना वापरून देशात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची जुनी कार्यपद्धती पुनरुजीवित केली असण्याची संभावना आहे. मात्र गेल्या काही दिवसातील घटनांमध्ये डॉक्टर आणि सॉफ्टवेअर इंजिनियर्सना केलेल्या अटकां यावेळी ही कार्यपद्धती राबवताना त्यात थोडा बदल करून डॉक्टर, सॉफ्टवेअर इंजिनियर अशा सन्मानित पेशातील लब्धप्रतिष्ठित लोकांना पुढे करण्याचे धोरण स्वीकारल्याकडे निर्देश करतात.

अशा सन्मानित पेशातील लब्धप्रतिष्ठित लोकांना समाजात महत्वाचे स्थान मिळत असल्याने त्यांच्या कारवाया उघडकीस आणणे तपास यंत्रणांना अवघड जाते हे यापूर्वीच्या काही प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे या नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नागरिक म्हणून आपण सर्वानीच सावध राहून तपास यंत्रणांना आणि पोलिसांना सहकार्य करणे अत्यावश्यक ठरते.

Exit mobile version