24 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरविशेष१९ ऑक्टोबरलाच लीड मिळाला होता...सिंदूर २.० चे संकेत; अल फलाहचा चेअरमनच दाखलेबाज

१९ ऑक्टोबरलाच लीड मिळाला होता…सिंदूर २.० चे संकेत; अल फलाहचा चेअरमनच दाखलेबाज

Google News Follow

Related

दिल्लीत काल सोमवारी लाल किल्ल्याजवळच्या रस्त्यावर झालेला स्फोट हा बहुधा दहशतवाद्यांच्या नियोजनाचा भाग नव्हता. देशभरात दहशतवाद्यांची धरपकड होत असल्याचे समजल्यामुळे ऐनवेळी धास्तावलेल्या दहशतवाद्याने करायचा नव्हता तिथे स्फोट केला. काश्मीरमध्ये लावण्यात आलेल्या काही पोस्टरमुळे हा संपूर्ण कट पोलिसांसमोर आला. कटाचा हा पहीला धागा १९ ऑक्टोबर रोजी सुरक्षा यंत्रणांच्या हाती आला होता.

जम्मू काश्मीर, हरीयाणा, उत्तर प्रदेश, गुजरातमधील सुरक्षा यंत्रणांच्या संयुक्त कारवाईत सापडलेली घातक रसायने, हत्यारे आणि झालेल्या अटका पाहील्या तर आपल्या लक्षात येईल की एक खूप मोठे षडयंत्र उधळले गेले आहे.

२९०० किलो स्फोटके, दोन एके ४७, टायमर, विदेशी बनावटीची पिस्तूलं, ऑक्टोबर महिन्यात काश्मीरच्या नौगाव, श्रीनगरमध्ये जैश ए मोहम्मद या संघटनेची काही पोस्टर लागली होती. या पोस्टरमध्ये सुरक्षा दलांवर हल्ला करण्याची चिथावणी देण्यात आली होती. श्रीनगरच पोलिस अधिक्षक जीव्ही संदीप चक्रवर्ती यांचे लक्ष या पोस्टरवर गेले. त्यातून जो तपास सुरू झाला, त्याचे फलित म्हणजे पकडला गेलेला स्फोटकांचा साठा आणि दहशतवादी.

काल न्यूज डंकाच्या व्हीडीयोमध्ये आम्ही म्हटले होते की आपल्या सुरक्षा यंत्रणा फेसस्कॅन तंत्राचा वापर करतात. जिथे पोस्टर लावण्यात आली होती, त्या भागाचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. त्यातून तीन जणांचा छडा लागला. त्यांचा रेकॉर्ड तपासल्यानंतर हे तिघे २०१९ च्या आधी काश्मीरमध्ये होणाऱ्या दगडफेकीतही सामील असल्याचे उघड झाले. हा तपास सुरक्षा यंत्रणांना शोपियानमधील मौलवी इरफान अहमद यांच्यापर्यंत घेऊन गेला. हा मौलवी काश्मीरमध्ये तरुणांना जिहादचे धडे देत होता. त्याना जिहादसाठी तयार करत होता. तीन आठवडे या मौलवीची चौकशी सुरू होती. पोलिसांनी याला व्यवस्थित बॉडी मसाज दिल्यानंतर इरफान ओकू लागला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे पुढची साखळी उघड झाली.

हे ही वाचा:

दिल्ली स्फोटप्रकरणी लखनऊमधून डॉ.परवेझला अटक

फक्त ५५ धावांत कोसळली दक्षिण आफ्रिका!

दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे

इस्लामाबादमध्ये न्यायालय परिसरात स्फोट; १२ जणांचा मृत्यू

सुरक्षा यंत्रणा जेव्हा संशयित दहशतवाद्यांना किंवा कट्टरतावाद्यांना ताब्यात घेतात. तेव्हा त्यांच्याकडून फारशी माहिती मिळण्याची शक्यता नसली तरी त्यांचे लॅपटॉप आणि मोबाईल भरपूर माहिती देतात. त्यांच्या कॉल रेकॉर्डवरून बराच तपशील उघड होतो. काश्मीरात लावलेल्या पोस्टरवरून सुरक्षा यंत्रणा जर एक मोठे षडयंत्र उकरून काढत असतील तर दहशतवाद्यांकडे सापडलेल्या इल्ट्रॉनिक पुराव्यांवरून ते तपासाला कोणत्या उंचीवर नेत असतील याची कल्पना करा. इरफानच्या माहितीवरून तीन डॉक्टरांना अटक कऱण्यात आलेली आहे. चौथा डॉ. उमर मोहम्मह. लाल किल्ल्याजवळ ज्या आय २० कारचा स्फोट झाला. त्यासोबत ढगात गेल्याची शक्यता आहे. यावर अजून तपास यंत्रणांनी शिक्कामोर्तब झालेले नाही. हा उमर सुद्धा पुलवामाचाच आहे.

डॉ. मुजम्मील गनी हा पुलवामाचा रहीवाशी सध्या फरीदाबादच्या अल फलाह युनिवर्सिटीमध्ये नोकरी करतो, त्याच्याकडे ३५० किलो स्फोटके, एक एके ४७ रायफल सापडली आहे. याच्यासोबत जम्मू काश्मीरच्या कुलगामचा रहीवासी डॉ.अदील अहमद राथर यालाही अटक कऱण्यात आलेली आहे. मुजम्मीलची गर्लफ्रेण्ड डॉ.शाहीन शाहीद हीलाही हरीयाणामध्ये अटक कऱण्यात आलेली आहे. तिच्या कारमध्ये एके ४७ आणि काडतूसे सापडली. ही लखनौची राहणारी आहे. स्फोटकांची ने-आण करण्यासाठी तिचा काही वापर करण्यात आला का याचा तपास सुरू आहे. जम्मू काश्मीर पोलिस तिची चौकशी करीत आहेत. तिला विमानाने काल काश्मीरमध्ये नेण्यात आले.

अल फलाह युनिवर्सिटी सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आलेली आहे. या युनिवर्सिटीच्या प्रयोगशाळेचा या सगळ्या घटनाक्रमाशी संबंध असल्याचा संशय आहे. युनिवर्सिटीशी संबंधित डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे.  या युनिवर्सिटीचा चेअरमन जवाद अहमद सिद्दीकी हा इसम आहे. हा खानदानी फ्रॉड आहे. त्याच्या परीवाराचा अल फलाह ग्रुप आहे. अल फलाह इन्वेस्टमेंट ही त्याची कंपनी. जिच्या माध्यमातून हलाल बॅंकीगच्या नावाने त्याने मुस्लीमांकडून कोट्यवधी गोळा केले आणि ते गिळले. अनेक गुंतवणूकदारांनी त्याच्या विरोधात तक्रार केल्यानंतर याप्रकरणी त्याला त्याच्या दोन भावांसह अटक झाली होती. तो बराच काळ तिहार तुरुंगातही होता. ज्या युनिवर्सिटीचा चेअरमन तिहार तुरुंगाची वारी करून आलेला आहे. त्याच्या युनिवर्सिटीमध्ये असे काही जिहादी डॉक्टर सापडले असतील तर त्यात नवल ते काय? इथे फक्त दाल मे काला है की पुरी दाल काली है, याचा तपास करण्याची गरज आहे. ही युनिवर्सिटीया जिहादच्या केंद्र स्थानी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जवाद सिद्दीकीची चौकशी अपरीहार्य ठरते.

दिल्लीतील स्फोटानंतर देशभरात आता तपास सुरू असेल. १० नोव्हेंबरला जे काही घडले त्याचा अर्थ उघड आहे. त्यांना १७ वर्षांनंतर पुन्हा २६/११ घडवायचे होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात हत्यारे, स्फोटके दिल्लीत आणण्यात आली होती. जे काही सापडले त्या पलिकडेही काही आणले असण्याची शक्यता आहे. आणखी काही लोक यात सामील असण्याची शक्यता आहे. सुरक्षा यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. पाकिस्तानात ट्रेनिंगला जाऊन परतलेले तरुण, अंडरवर्ल्डचे हस्तक, मशीदींचे मौलवी, ड्रग्जच्या धंद्यात सामील असलेले माफिया या सगळ्यांवर येत्या काही दिवसांत करडी नजर असणार आहे. यापैकी अनेकांना आधीच उचलण्यात आले असेल. सेफ हाऊसमध्ये त्यांची व्यवस्थित खातीरदारी सुरू असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पूर्व नियोजित दौऱ्या निमित्त भुतानमध्ये होते. ते म्हणाले की मी जड अंत:करणाने इथे आलेलो आहे. दिल्लीमध्ये काल भयावह घटनेमुळे सगळ्यांचे मन व्यथित झाले आहे. रात्रभर मी संबंधित सुरक्षा यंत्रणांशी चर्चा करत होतो, त्यांच्याशी चर्चा करत होतो. कड्या जोडल्या जात आहेत. आमच्या सुरक्षा  यंत्रणा याच्या मुळाशी जातील. याच्या मागे जे कटवाले आहेत, त्यांना क्षमा नाही. All those responsible will be brought to justice…

पहेलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान म्हणाले होते Indias spirit will never broken by terrorism, every effort will be made to insure justice is done. We will identify, track and punish every terrorist and their backers…

याच इशाऱ्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. सिंदूर 2.0 राबवणे भारतासाठी अपरीहार्य आहे. कारण पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते. दहशतवाद्यांना आणि भारतविरोधी शक्तींना पाठीशी घालणे जर पाकिस्तानने सुरू ठेवले तर भारी किंमत चुकवावी लागले. त्यामुळे आता युद्ध सुरू होणार हे निश्चित. ते आधीच्या युद्धाच्या तुलनेत अधिक व्यापक होण्याचीही शक्यता आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा