दिल्लीत तरुण कुमारवर झालेला जिहादी हल्ला आणि त्यानंतर मुंबईत कुरार गावातील इस्लामपुरामध्ये हिंदू मुलींवर २० जणांच्या जिहादी जमावाने केलेला हल्ला याविषयी संताप व्यक्त होत असतानाच पाच दिवसांपूर्वी बीडच्या बालेपीर येथे मुस्लिमांनी एका माजी सैनिकावर केलेल्या हल्ल्याच्या बातमीने महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. बीड हे गुन्हेगारीच्या विविध घटनांमुळे सतत चर्चेत असलेले शहर आहे. आता या घटनेने माजी सैनिकांनाही जगणे मुश्कील झाले आहे असा सवाल विचारला जात आहे.
जालिंदर सानप हे माजी सैनिक आहेत त्यांची गाडी रिव्हर्स घेत असताना तिथे असलेल्या चहाच्या टपरीला धक्का लागल्यावरून वाद झाला आणि त्यानंतर १०० एक मुस्लिमांचा जमाव तिथे आला. त्या चहावाल्याने सानप यांच्या अंगावर उकळता चहा फेकला. त्यात सानप हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्या मानेपासून पोटापर्यंत उकळत्या चहामुळे खोलवर जखमा झाल्या. त्यामुळे त्यांना काही बोलताही येत नव्हते. आता ते बोलू शकत आहेत आणि त्यांनी एका यूट्युबरला मुलाखत देत झाल्या घटनेची भयंकर कहाणी सांगितली. त्यांच्या डोक्यावर रॉडने प्रहार करण्यात आल्यामुळे ८-१० टाकेही घालण्यात आले.
हे ही वाचा:
क्रिटिकल मिनरल्सच्या लिलावासाठी सातवा टप्पा; आत्मनिर्भर भारताला चालना
धुरंधर २ चे तीन दिवसात ५०० कोटी!
सरकारचा मोठा निर्णय; कमर्शियल गॅस पुरवठ्यात ५०% वाढ
खासदार उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीमुळे वैतागले
सानप यांच्या पत्नीचाही व्हीडिओ समोर आला असून त्यांनी रडत रडत ही कहाणी सांगितली आहे. यासंदर्भात अजून गुन्हा दाखल झालेला आहे अथवा नाही, याची माहिती समोर आलेली नाही. पण सदर गुंडांवर कठोर कारवाई करा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. याबाबत प्रारंभी जणू काही सानप यांची चूक असल्याप्रमाणे बातम्या समोर आल्या होत्या पण प्रत्यक्षात सानप यांच्यावरच कसा जीवघेणा हल्ला करण्यात आला हे त्यांच्या अवस्थेवरून आता स्पष्ट होते आहे.
