अशोक खरात प्रकरणाने सध्या महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. हा अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे व्हीडिओ समोर आलेत आणि त्यामुळे बुवाबाजीच्या माध्यमातून त्याने महिलांना कसे लक्ष्य केले, कशी माया जमवली याचे नवनवे पुरावे समोर आले.
नाशिकमधील एका महिलेने यासंदर्भात जो एफआयआर नोंदवला तो या अशोक खरातचे भयानक वास्तव सांगणारा आहे.
असा आहे तो एफआयआर…
माहे जुलै २०२१ मध्ये मला पाथर्डी, नाशिक येथील लग्नाचे स्थळ आले होते. त्या स्थळाबद्ध अशोककुमार बाबांना विचारण्याकरीता मी माझे जीजु गोरख मोरे यांचेसोबत अशोककुमार बाबांचे ऑफिसमध्ये गेले. तेथे गेल्यावर अशोककुमार बाबांनी मला एक काळया रंगाचा खडा गळयात पेंडेंट बनवुन घालण्यासाठी दिला. सदरचा खडा गळ्यात घातल्यास तुला मागणी केलेल्या मुलासोबत तुझे लग्न जुळेल. जर हा खडा तु गळ्यात घातला नाहीस व घातल्यानंतर काढून टाकलास, तर तुझे ठरलेले लग्न मोडेल, असे अशोककुमार बाबांनी मला सांगितले. त्याप्रमाणे मी अशोककुमार बाबांनी दिलेला काळा खडा पेंडेंट बनवुन गळयामध्ये घातला. त्यानंतर माहे जुलै २०२१ मध्ये माझा सायखेडा येथे गावाकडे साखरपुडा झाला. परंतु त्या दरम्यान भी एमएससीचे शिक्षण घेत असल्याने कॉलेजला गेल्यावर अशोककुमार बाबांनी दिलेला खडा भी गळ्यातुन काढून ठेवायला लागले. माझा साखरपुडा झाल्याने मला खडयाची गरज नसल्याचे मला वाटले. त्यामुळे अशोककुमार बाबांनी दिलेला खडा कॉलेजला गेल्यावर मी काढुन ठेवत असे. त्यानंतर एक आठवडयानंतर माझ्या होणा-या सासरच्या लोकांनी लग्न करण्यास नकार देवुन लग्न मोडले. तेंव्हा मला व माझ्या घरच्यांना धक्काच बसला. तेंव्हा माझा अशोककुमार बाबांवर विश्वास बसु लागला. अशोककुमार बाबांनी दिलेला खडा मी काढल्यामुळेव माझे लग्न मोडले. असा माझा समज होवुन अशोककुमार बाबांच्या बोलण्यावर माझा अंधविश्वास बसला. त्यानंतर त्या महिन्यात मी पुन्हा माझे जीजु गोरख मोरे यांचेसोबत अशोककुमार बाबांच्या ऑफिसला गेले. अशोककुमार बाबांच्या ऑफिसला गेल्यावर बाबांना लग्न मोडल्याचे सांगितले. मी कॉलेजला गेल्यावर गळयातुन खडा काढुन ठेवत होते, असेही त्यांना सांगितले. तेंव्हा बाबांनी सांगितले की, तु काळजी करू नको, मी तुला पुष्कराज नावावा खडा देतो, तो खडा तु खंडोबाच्या मंदिरात जावुन खंडोबाला ११ नारळ अर्पण करून गळयात पेंडेंट बनवुन घाल, तुझे चांगल्या ठिकाणी लग्न जुळेल, तु माझ्या मुलीसारखी असुन तुझे कन्यादान मी स्वतः करेन, असे अशोककुमार बाबांनी मला सांगितले. त्यानंतर अशोककुमार बाबांनी त्यांचे टेबलच्या ड्रॉवर मधुन एक फिक्कट रंगाचा खडा काढुन टेबलावर ठेवला व काहीतरी मंत्र पुटपुटले. त्यानंतर बाबांनी तो खडा मला गळयात घालण्यासाठी दिला. सदर खडा मी सिध्द करून तुला दिला असुन हा घातल्यावर तुझे कल्याण होईल असे बाबांनी मला सांगितले व तो खडा मला दिला. सदरचा खडा दुर्मिळ असल्यावे सांगुन बाबांनी ५० हजार रू मागितले. तेंव्हा माझ्या जीजुंनी बाबांना ५० हजार रू रोख दिले. अशोककुमार बाबांनी सांगितल्याप्रमाणे मी सिन्नर येथील खंडोबाच्या मंदिरात जावुन
बाबांनी सांगितल्याप्रमाणे ११ नारळ खंडोबास अर्पण करून बाबांनी दिलेला खडा गळयात घातला. त्यानंतर माहे नोव्हेंबर २०२२ पर्यंत मला लग्नासाठी वेगवेगळी स्थळे येवु लागली. जी स्थळे आम्हाला आवडत होती, त्या स्थळांबाबत मी व माझे जीजु असे बाबांच्या ऑफिसमध्ये जावुन त्यांचेबाबत बाबांना विचारत होतो. परंतु बाबा ही स्थळे योग्य नसल्याचे सांगत होते. माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये मला शाहुनगर सिडको, नाशिक येथील जयंत चांगदेव मुंगसे यांचे स्थळ आले. मुलाकडील लोकांनी मला लग्नासाठी मागणी घातल्यानंतर पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलाला मी व मला मुलगा पंसत पडला. त्यानंतर लग्नाची बोलणी करण्याचे ठरले. तेंव्हा माझे जीजु यांनी लग्नास मागणी घातलेल्या मुलास अशोककुमार खरात बाबांबद्दल सांगितले व आशिर्वादाकरीता त्यांचे ऑफिसमध्ये जावु असे सुचविले. त्यानंतर चार पाच दिवसांनी मी, माझे जीजु तसेच माझे होणारे पती असे आम्ही अशोककुमार बाबांच्या ऑफिसमध्ये गेलो. अशोकुमार बाबांचे ऑफिसमध्ये गेल्यावर बाबांनी सदर मुलगा हा तुझ्यासाठी योग्य असल्याचे सांगितले. तसेच साखरपुडा झालेनंतर माझे मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरात तुझ्या आणि तुझ्या होणा-या पतीच्या हातुन सिध्दपुजा करावी लागेल असे बाबांनी मला सांगितले. बाबांवर आमचा पूर्ण विश्वास बसलेला असल्याने मी तसेच माझे होणारे पती यांनी मिरगाव येथे जाऊन ईशान्येश्वराचे मंदिरात – पूजा करण्याचे ठरविले. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्येच माझा साखरपुडा झाला.
हे ही वाचा:
गुलजार ए रजाच्या ट्रस्टचा पर्दाफाश, विघातक उद्दिष्टे
४८ तासांत ४ हल्ले, इराणविरोधात एकत्र येण्याचे नेतान्याहूंचे आवाहन
बोगदा खणणाऱ्या मशिन आल्या, बुलेट ट्रेनच्या कामाला वेग
₹२00 कोटींचा मिहान लॉजिस्टिक पार्क
साखरपुडा झाल्यावर अशोककुमार खरात या बाबांचा आशिर्वाद घेण्याकरीता मी व माझे होणोरे पती व माझे जीजु असे आम्ही बाबांच्या ऑफिसमध्ये गेलो. तेथे गेल्यावर बाबांनी मला ब्राउन रंगावा खडा व माझे होणारे पतींसाठी हिरव्या रंगावा खड़ा पंचधातुच्या अंगठीमध्ये घालण्याकरीता दिला. त्या खडयांचे प्रत्येकी १४ हजार रू असे एकुण २८ हजार रू बाबांनी माझेकडून व माझ्या होणा-या पतींकडून घेतले.
त्यानंतर एक आठवडयानंतर बाबांनी मला फोन करून मिरगाव येथील मंदिरात करावयाच्या विधीबाबत चर्चा करायची असल्याचे सांगुन मला ऑफिसमध्ये येण्याबाबत सांगितले. माझे जीजु हे काही कामानिमित्त बाहेरगावी असल्याने व माझी बहीण आजारी असल्याने घरातील कोणीही माझेसोबत येवु शकले नाही. तसेच माझे पती देखील कामात व्यस्त असल्याने बाबांनी बोलविल्याप्रमाणे मी त्यांचे ऑफिसमध्ये एकटीच गेले. ऑफिसमध्ये गेल्यानंतर अशोकुमार बाबांनी मला त्यांचे चेंबरमध्ये बोलावून घेतले. बाबांनी चेंबरमध्ये बोलविल्यावर मला खुर्चीवर बसण्यास सांगितले. त्यानंतर बाबांनी मला प्रसाद म्हणून अगोदर पेढा खावयास दिला. त्यानंतर मला त्यांनी एका तांब्याच्या भांडयात असलेले पाणी ग्लासमध्ये पिण्यास दिले. पाणी पिल्यानंतर मला त्या पाण्याची चव खारट व कडवट लागली. पाणी पिल्यानंतर मला गरगरल्यासारखे व मळमळल्यासारखे वाटु लागले. तेंव्हा बाबांनी मला सांगितले की, हे पाणी तू जितके जास्त प्रमाणात पिशील तितके तुला जास्त शुभ फळ भेटेल. असे बोलून बाबांनी मला पाणी प्यायलेला ग्लास डोक्यावर धरून उभे राहण्यास सांगितले व डोळे बंदरून गायत्री मंत्र म्हणण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी ग्लास डोक्यावर धरून उभी राहिली व डोळे बंद करून गायत्री मंत्र म्हणू लागले. त्यानंतर बाबांनी त्यांचे ऑफिसमधील लाईट बंद केली. त्यानंतर अशोककुमार बाबा माझे पाठीमागे येवुन उभे राहिले व गायत्री मंत्र म्हणू लागले. त्यांनी मला डोळे बंद करून उभे राहण्यास व मंत्रोच्चार थांबविण्यास सांगितले. त्यानंतर बाबांनी माझे अंगाला स्पर्श करण्यास सुरुवात केली व तुला या ठिकाणी दोष आहे असे बोलून अंगावरील सर्व ठिकाणी बाबा स्पर्श करू लागले. त्यानंतर बाबांनी मला पाठीमागून मिठी मारली. त्यावेळी मी बाबांना दूर लोटण्याचा प्रयत्न करून तसे करण्यास नकार दिला. तेंव्हा बाबांनी मला सांगितले की, मी श्रीकृष्णाचा अवतार असुन तू माझी त्या जन्मातील राधा आहेस, या जन्मात देखील तू माझी प्रेयसी म्हणून रहा. असे बोलून बाबांनी मला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा मी बाबांना नकार देवुन दूर ढकलले. परंतु बाबांनी मला पेढा व कडवट व खारट पाणी पिण्यास दिले होते, पेढा खाल्ल्यामुळे व पाणी प्यायल्यामुळे माझे डोके जड झाले होते व बाबांचे प्रत्येक बोलणे मला त्यांचेकडे वश करत आहे असे वाटत होते. त्यांचे बोलण्यामुळे मी त्यांचे मानसिक प्रभावाखाली येत असल्याचे व त्यांचे म्हणण्याप्रमाणे ऐकण्यास भाग पडत असल्याचे मला जाणवत होते.
डोके जड झाल्यानंतरही मी अशोककुमार बाबांना नकार देत राहिले, तेव्हा बाबांनी मला धमकी दिली की, परमेश्वराचा कोप होवुन तुझे पुन्हा लग्न मोडेल. तसेच माझी दिव्यशक्ती मी तुला देऊन एकप्रकारे मी तुला पवित्र करीत आहे, त्यास तू नकार दिल्यास तुझे लग्न तर मोडेलच, आणि तुझा होणारा नवरा देखील मरून जाईल व तुझे लग्न देखील होणार नाही. अशी बाबांनी भीती घातल्याने मी त्या दिवशी बाबांना काहीएक प्रतिकार करू शकले नाही.
त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये माझे जीजुनी घरी येऊन अशोकुमार बाबांनी मिरगाव येथील मंदिरात करावयास सांगितलेली पुजा करावी लागेल, नाहीतर पुन्हा अडचणी येतील, असे सांगितल्याने घरच्यांचे संमतीने मी, माझे जीजु व माझे होणारे पती असे आम्ही मिरगाव, सिन्नर येथील ईशान्येश्वर मंदिरात जाऊन अशोकुमार बाबांनी सांगितल्याप्रमाणे पुजा केली. त्यानंतर एक आठवडयानंतर दि. २९/१२/२०२२ रोजी माझे लग्न झाले. त्यानंतर माहे जानेवारीचे शेवटच्या आठवडयात बाबांनी माझे पतींना फोन करून जोडीने आशिर्वाद घेण्यासाठी त्यांचे ऑफिसमध्ये बोलविले. त्यानंतर मी व माझे पती असे आम्ही बाबांचा आशिर्वाद घेण्यासाठी त्यांचे ऑफिसमध्ये गेलो, तेथे गेल्यावर आम्ही दोघेही बाबांच्या पाया पडलो. त्यानंतर बाबांनी माझे पतींचा व माझा तळहात बघितला, व काहीतरी मंत्र पुटपुटुन आम्हा सांगितले की, लग्नामध्ये तुम्हाला लोकांची नजर लागलेली असून तुम्हाला लागलेला नजरदोष दूर करावा लागेल, नजरदोष दूर केला नाही तर तुझ्या नव-या जीवाला धोका आहे, असे बाबांनी सांगितले. त्यानंतर बाबांनी एक प्लॅस्टिकची भरलेली पाणी बॉटल आम्हाला दिली व तीन दिवस बेडरूममध्ये ठेवण्यास सांगितली, जर ते पाणी काळे झाले तर तुम्हाला लागलेली नजर दूर होईल, पाणी काळे झाल्यास ते पाणी वडाच्या झाडाजवळ ओतण्यास बाबांनी आम्हाला सांगितले, तसेच बेडरूममधील बेडच्या खालील जमिनीवरील माती किंवा धूळ किंवा कचरा घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर अशोकुमार खरात बाबांनी माझे पतीना सांगितले की तुम्ही चेंबरच्या बाहेर जा, मला रिंकुला ध्यानस्थ करून तिच्यासाठी प्रार्थना करावयाची आहे. असे बाबांनी सांगितल्यावर व बाबांवर माझे पतींचाही विश्वास बसलेला असल्याने माझे पती अशोकुमार बाबांच्या चेंबरच्या बाहेर गेले. अशोकुमार बाबांच्या चेंबरमधील बाहेरून आतमधील काहीएक दिसत नसल्याने बाबांनी माझे पती बाहेर गेल्यावर मला चेंबरचा दरवाजा लॉक करण्यास सांगितले. त्यानंतर बाबांनी मला तांब्याच्या भांडयात असलेले पाणी पिण्यास दिले. पूर्वीप्रमाणे पिण्यास दिलेल्या पाण्याचे चवीप्रमाणेच त्या पाण्याची चव पुन्हा खारट व कडवट लागली. पाणी प्यायल्यानंतर मला गरगरल्यासारखे व मळमळल्यासारखे झाले, तेंव्हा देखील बाबांनी मला सांगितले की, हे पाणी तू जितके जास्त प्रमाणात पिशील तितके तुला जास्त शुभ फळ मिळेल. बाबांनी मला पाण्याचा ग्लास पूर्वीप्रमाणेच डोक्यावर ठेवून उभे राहण्यास सांगितले व डोळे बंद करून गायत्री मंत्र म्हणण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी ग्लास डोक्यावर ठेवुन उभी राहिली व डोळे बंद करून गायत्री मंत्र म्हणू लागले. त्यानंतर माझे डोके जड होवू लागले, बाबांनी त्यांचे, ऑफिसमधील लाईट बंद करून माझे पाठीमागे येवुन मंत्र म्हणू लागले. त्यानंतर बाबांनी मला पाठीमागुन मिठी मारली आणि मी श्रीकृष्णाचा अवतार असून तू माझी राधा आहेस, असं सारखे माझ्या कानाजवळ बोलून मला संमोहीत केले. मी बाबांना नकार देत होते परंतु बाबांनी दिलेल्या धमकीमुळे मी आरडाओरडही करू शकत नव्हते. बाबांनी माझेवर बलात्कार केला, त्यादिवशी बाबांनी मला कोणास काहीएक सांगितल्यास मी तुला आणि तुझ्या नव-याला जीवानिशी ठार मारेन, त्या भीतीने व बाबांवर लोकांचा खूप विश्वास असल्याने माझे कोणीही ऐकून घेणार नाही या विचाराने मी त्याबाबत कोणास काहीएक सांगितले नाही.
मी लग्नानंतर डी फार्मसीला अॅडमिशन घेतले होते. तेंव्हा अशोककुमार बाबांनी मला फोन करून प्रत्येक परिक्षेअगोदर माझेकडे आशिर्वाद घेण्यासाठी तुला यावे लागेल, नाहीतर मी तुझ्या नव-याला तू बाहेरख्याली आहे असे सांगून तुझे आयुष्य बरबाद करेन, अशाप्रकारे धमकी दिली. शिवाय त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून बलात्कार केले. अशोककुमार बाबा माझेसोबत जे करत होते ते मी माझे इच्छेविरूध्द करत होते. बाबा मला व माझ्या नव-याला ठार मारतील व बदनामी करतील या भीतीपोटी मी कोणास काहीएक सांगू शकत नव्हते.
माहे डिसेंबर २०२४ मधील सुरुवातीच्या आठवडयात अशोकुमार बाबांनी माझे पती जयंत मुंगसे यांना फोन करून मला व माझे पती असे दोघांना ऑफिसमध्ये आशिर्वाद घेण्यासाठी बोलवुन घेतले. बाबांनी यापुर्वीच मला धमकी दिलेली असल्याने मी माझे पतीसोबत बाबांचे ऑफिसमध्ये आशिर्वाद घेण्यासाठी गेले. ऑफिसमध्ये गेल्यावर बाबांनी नेहमीप्रमाणे गाझे पती जयंत यांना माझी ध्यानधारणा करून प्रार्थना करावयाची आहे असे सांगून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. माझे पती बाहेर गेल्यावर बाबांनी यापुर्वी मला दिलेल्या धमकीमुळे इच्छा नसतांना देखील चेह-यावर हास्य ठेवून अशोकुमार बाबा जसे सांगतील तसे केले. अशा प्रकारे मी माझे डी फार्मसीचे सन २०२३ ते डिसेंबर २०२५ मध्ये शिक्षण घेत असतांना बाबांनी आशिर्वादाच्या नावाखाली ऑफिसमध्ये बोलावून घेऊन माझ्यावर वारंवार बलात्कार केले आहेत.
त्यानंतर दि.१५/०३/२०२६ रोजी अशोककुमार खरात बाबा हे भोंदुबाबा असुन तो तंत्र मंत्राच्या नावाखाली व धार्मिक आस्थेच्या नावाखाली स्त्रियांना त्यांचे आप्तजनांच्या जीवाची भीती घालून त्यांचे लैंगिक शोषण करतात याबाबत माझे जीजु गोरख मोरे यांना लोकांकडुन समजले असल्याचे त्यांनी मला सांगितले. त्या दिवशी त्यांनी मला विश्वासात घेऊन तुझ्यासोबत बाबांनी असे काही केले आहे का याबाबत विचारले. सुरुवातीला मी खूप घाबरले. परंतु जीजुंनी मी तुझ्या पाठीशी उभा राहीन, तु कोणतीही काळजी करू नको, तुझ्यावर अत्याचार झाले असतील तर आपण त्या नराधमाविरुध्द पोलीसात तकार करू, असे सांगितल्याने मला धीर आला. मी खूप हिंमतीने अशोककुमार खरात या बाबांनी मला सुरूवातीला गुंगीकारक पदार्थ व चव नसलेले खारट व कडवट नशायुक्त पाणी पिण्यास देऊन, मला माझे पतीच्या जीवाची भिती घालून, जीवे ठार मारण्याची धमकी देऊन माझी इच्छा नसतांना माझ्यावर वारंवार बलात्कार केले असल्याचे मी जीजुंना सांगितले. जीजु गोरख मोरे यांनी मला धीर दिल्याने मी अशोकुमार खरात उर्फ कॅप्टन या मांत्रिक बाबाविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले आहे.
तरी माहे नोव्हेंबर २०२२ ते माहे डिसेंबर २०२५ या कालावधीत ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर, नाशिक या ठिकाणी अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन या भोंदुगिरी करणा-या मांत्रिक बाबाने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली माझ्या मनात विश्वास निर्माण केला. ऑफिसला बोलावून माझ्या धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन गुंगीकारक पदार्थ खायला व पाणी पिण्यास देऊन मला संमोहीत केले. त्यानंतर माझे आयुष्य बरबाद करून टाकेन अशी धमकी देऊन माझ्या पतीच्या मरणाची भीती घालून माझी इच्छा नसतांना माझेवर वारंवार बलात्कार केले. म्हणून माझी अशोककुमार एकनाय खरात उर्फ कॅप्टन, रा. प्लॉट नं ३७, तृप्तबाला, स. नं. ७७७/२/१, कर्मयोगी मगर, तिडके कॉलनी, गोविंदनगर लिंकरोड, नाशिक या भोंदुबाबा विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे.
