रोहतकमधील सायबर सेलमध्ये तैनात असलेले सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) संदीप कुमार यांनी तीन पानांची चिठ्ठी आणि एक व्हिडिओ संदेश मागे सोडत आत्महत्या केली. त्यांनी चिठ्ठीत दिवंगत आयपीएस वाय पूरन कुमार यांचे नाव लिहित भ्रष्टाचाराचा आरोप केले. यामुळे आयपीएस वाय पूरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणाला देखील वेगळे वळण मिळाले आहे. यानंतर आता आयपीएस वाय पूरन कुमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हरियाणा पोलिस अधिकारी संदीप कुमार यांच्या आत्महत्येप्रकरणी रोहतक पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांचा बंदूकधारी सुशील, त्यांची पत्नी पी. अवनीत कौर, भटिंडा ग्रामीणचे आमदार अमित रत्न आणि आणखी एका व्यक्तीचे नाव आहे. अधिकाऱ्यांनी आरोपींविरुद्धचे विशिष्ट आरोप उघड केलेले नाहीत आणि सध्या तपास सुरू आहे.
हरियाणा पोलिसांच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या धक्कादायक आत्महत्या आणि राज्य पोलिसांमध्ये जातीय भेदभाव, भ्रष्टाचार आणि खंडणीच्या आरोपांमुळे या प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रोहतकमधील सायबर सेलमध्ये तैनात असलेले सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) संदीप कुमार यांनी तीन पानांची चिठ्ठी आणि एक व्हिडिओ संदेश मागे सोडत आत्महत्या केली. त्यांनी चिठ्ठीत दिवंगत आयपीएस वाय पूरन कुमार यांचे नाव लिहित भ्रष्टाचाराचा आरोप केले आहेत.
हे ही वाचा..
“पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलेय, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही”
अमृतसरमध्ये अवैध शस्त्र, ड्रग्जसह ३ तस्करांना अटक
चीनमध्ये धान्य खरेदीचे ९०% पेक्षा जास्त प्रमाण बाजारावर आधारित
एसटी बँकेत झाली हाणामारी, सदावर्ते-अडसूळांचे कार्यकर्ते भिडले
यापूर्वी आयपीएस वाय पूरन कुमार यांनीही आत्महत्या करून चिठ्ठी मागे सोडली होती. रोहतकच्या सुनारिया येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात तत्कालीन महानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले कुमार यांनी त्यांच्या पत्नी, आयएएस अधिकारी अमनीत पुरण कुमार जपानच्या अधिकृत दौऱ्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. कुमार यांनी सुसाईड नोटमध्ये डीजीपी शत्रुजीत कपूर आणि रोहतकचे माजी एसपी नरेंद्र बिजर्निया यांच्यासह आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे घेतली होती आणि त्यांच्यावर छळ, जाती-आधारित भेदभाव याचे आरोप केले होते.
