गँगस्टर डी.के. रावसह तिघांना खंडणी प्रकरणी अटक

गँगस्टर डी.के. रावसह तिघांना खंडणी प्रकरणी अटक

मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गँगस्टर मल्लेश बोरा उर्फ डी.के. रावसह तिघांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये डी.के. राव, अनिल सिंग आणि बांधकाम व्यावसायिक मिमित भुता यांचा समावेश आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांना शनिवारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मिमित भुता हा बांधकाम व्यवसायिक असून त्याच्या प्रकल्पांमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, गुंतवणूकदारांना दीर्घकाळ कोणताही मोबदला न मिळाल्याने त्यांनी आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली.

या पार्श्वभूमीवर, सव्वा लाख रुपये गुंतवणूक केलेल्या एका हॉटेल व्यवसायिकाने भुताकडे पैसे मागितल्यावर, भुताने आपल्या सहकारी अनिल सिंगच्या मार्फत गँगस्टर डी.के. रावला मध्यस्थी आणले. त्यानंतर डी.के. रावकडून संबंधित गुंतवणूकदाराला धमकीचे फोन येऊ लागले.

हे ही वाचा :

आदिवासी गल्लीपासून एशियन गोल्डपर्यंत

भारतचा ‘डॉन ब्रॅडमन’

टीम इंडियाची पहिली डाव ५१८/५ वर घोषित!

मुफलिसीच्या गल्लीपासून टीम इंडियापर्यंत — रिंकू सिंहची कहाणी ‘दिल से’!

या धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यवसायिकाने मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत डी.के. राव, अनिल सिंग आणि मिमित भुता यांना अटक केली. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.

Exit mobile version