मुंबई : गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे पार पडलेला भव्य म्युझिक कॉन्सर्ट आता गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. या कार्यक्रमाचे समोर आलेले ‘रेट कार्ड’, ड्रग्ज सेवनाच्या आरोपांमुळे झालेला दोन तरुणांचा मृत्यू आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरहान आवत्रामणी उर्फ ‘ऑरी’ची उपस्थिती यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
हे ही वाचा:
अमेरिकेचा मोठा निर्णय: इराण-रशिया तेल खरेदीवर पुन्हा निर्बंध
मारुती सुझुकीत ‘वुमन पॉवर’ वाढली; १,३००हून अधिक महिला कर्मचारी
गुजरात किनाऱ्यावर इराणी जहाज, पण भारताने तेल नाकारले
पाकिस्तानात सिरिंजचा पुनर्वापर; ३३१ मुलांना HIV संसर्ग
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये ‘ऑरी’ बेधुंद होऊन नाचताना दिसत आहे. याआधीही त्याच्यावर ड्रग्ज सेवनाचे आरोप झाले होते, तसेच मुंबई पोलिसांनी इतर एका प्रकरणात त्याची चौकशी केली होती. त्यामुळे अशा वादग्रस्त व्यक्तीची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.
‘रेट कार्ड’ पाहून सर्वसामान्य थक्क!
या कॉन्सर्टसाठी आकारण्यात आलेले दर अक्षरशः लाखोंमध्ये होते:
स्टेज टेबल – ३,००,०००
व्हीआयपी टेबल – १,००,००० ते १,५०,०००
व्हीआयपी पास – २,५०० ते १०,०००
बॅकस्टेज एन्ट्री – ५,९९९
अवाच्या सव्वा दर असूनही कार्यक्रम ‘हाउसफुल्ल’ झाला होता. हजारो तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.
ड्रग्ज सेवनाचा संशय; २ जणांचा मृत्यू …….
११ एप्रिल रोजी ‘999999999 – टेक्नो इव्हेंट’ या नावाने आयोजित या कॉन्सर्टदरम्यान काही जणांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान बिस्मातसिंह भसीन आणि श्रेया राय (२४) यांचा मृत्यू झाला.
वैद्यकीय अहवाल आणि एका बचावलेल्या तरुणीच्या जबाबातून कार्यक्रमात दारूसह ड्रग्जचे सेवन झाल्याचे समोर आले आहे. संबंधित तरुणीने यापूर्वीही अशा पार्ट्यांमध्ये ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांची कारवाई; सहा जणांना अटक…..
या प्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करत ड्रग्ज पुरवठादार आनंद पटेलसह सहा जणांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून, आयोजकांवरही कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.इतक्या महागड्या तिकिटांमागील नेमके कारण काय?कार्यक्रमात ड्रग्ज सहज उपलब्ध कसे झाले?सुरक्षा आणि नियमांचे उल्लंघन झाले का? प्रशासन ‘ऑरी’च्या उपस्थितीची दखल घेणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप अस्पष्ट असून, या ‘हाय-प्रोफाइल’ कॉन्सर्टमागील वास्तव उघड करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
