32.6 C
Mumbai
Monday, May 11, 2026
घरक्राईमनामानेस्को प्रकरणानंतर मुंबई पोलिसांचा धडाकेबाज अ‍ॅक्शन

नेस्को प्रकरणानंतर मुंबई पोलिसांचा धडाकेबाज अ‍ॅक्शन

२६ लाखांच्या ‘एक्स्टसी’ गोळ्यांसह ड्रग पेडलर अटकेत

Google News Follow

Related

मुंबई : गोरेगाव येथील नेस्को मैदानात झालेल्या संगीत कार्यक्रमात ड्रग्सचा अतीसेवनामुळे दोन जणांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली असून, त्याअंतर्गत अँटी-नार्कोटिक्स सेलने मोठी कारवाई करत एका ड्रग पेडलरला अटक केली आहे.
साकीनाका परिसरातून इरफान अली अन्सारी याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तब्बल २०० ‘एक्स्टसी’ (MDMA) गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गोळ्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे २६ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा:
लैंगिक शोषणाच्या प्रकरणानंतर टीसीएस नाशिक बीपीओचे कामकाज बंद!

५०० रुपयांमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन मुलींचे लैंगिक शोषण; फ्लॅट मालक अटकेत

अमेरिकन हल्ल्यानंतर बुडालेल्या इराणी जहाजातील बचावलेले सैनिक स्वदेशी रवाना

आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार? पण ते म्हणतात तथ्य नाही!

पोलिसांच्या माहितीनुसार, अन्सारी हा सराईत गुन्हेगार असून, २०२१ मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडूनही त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. सुमारे चार वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर तो वर्षभरापूर्वीच बाहेर आला होता.
दरम्यान, अटकेवेळी अन्सारीकडून एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये अनेक संशयित संपर्क क्रमांक आढळले आहेत. या क्रमांकांचा नेस्को ग्राउंडवरील पार्टीशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
अन्सारीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या अधिक तीव्र करण्यात आला असून, ड्रग्ज रॅकेटचा मोठा भांडाफोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा