कॅनडामधील कपिल शर्माच्या ‘कैप्स कॅफे’वर पुन्हा गोळीबार; चार महिन्यांत तिसरा हल्ला!

लॉरन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी

कॅनडामधील कपिल शर्माच्या ‘कैप्स कॅफे’वर पुन्हा गोळीबार; चार महिन्यांत तिसरा हल्ला!

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या ‘कैप्स कॅफे’वर पुन्हा एकदा गुन्हेगारी हल्ला झाला असून, गेल्या चार महिन्यांत हा तिसरा गोळीबार आहे. या घटनेची जबाबदारी कुख्यात लॉरन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅफेवर सुमारे सहा गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यामुळे एका खिडकीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ

हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये गोल्डी ढिल्लों आणि कुलदीप सिद्धू नावाच्या गुन्हेगारांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे म्हटले आहे. व्हिडिओमध्ये ते म्हणतात, “आम्ही, गोल्डी ढिल्लों आणि कुलदीप सिद्धू, कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर झालेल्या तिन्ही गोळीबारांसाठी जबाबदार आहोत. आमचा सर्वसामान्य लोकांशी कोणताही वैर नाही.”

टोळीचा इशारा

गँगस्टरांनी पुढे असेही म्हटले की, “ज्यांच्याशी आमचे वैर आहे, त्यांनी आम्हापासून लांब राहावे. जे लोक बेकायदेशीर काम करतात आणि पैसे न देता काम करवून घेतात, त्यांनी सावध राहावे.”

हे ही वाचा :

२० वर्षांपासून मुंबईत राहत होता घुसखोर बांगलादेशी, असा सापडला!

भंगार विक्रेत्याकडून लाच घेणारा पंजाबचा डीआयजी अटकेत

राहुरीचे भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन

दरम्यान, कपिल शर्माचा हा कॅफे ब्रिटिश कोलंबियामधील सरे या ठिकाणी आहे. गेल्या काही महिन्यांत या कॅफेवर सातत्याने हल्ले होऊ लागल्याने स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. कॅफेच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

Exit mobile version