राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. नगर जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय होते. राहुरीच्या आमदारकीसह त्यांच्याकडे अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचं अध्यक्षपदही होतं. पहाटे त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं.
शिवाजीराव कर्डीले यांना पहाटे त्रास जाणवू लागला. त्यांना अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं.
हे ही वाचा..
जगातील चांदी खेचून घेणारा हस्तर कोण?
“पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणताही फोन कॉल झालेला नाही!”
दिवंगत विनय आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन
शिवाजीराव कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते. नगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम पाहिले. शिवाजी कर्डिले हे २००९ मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. २०१४ ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. २०१४ च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती.







