पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमदार राजन नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत बहुजन विकास आघाडीचे सोपारा गावातील प्रमुख कार्यकर्ते, सेवन आर्ट ग्रुप व सोपारा मित्र मंडळाचे प्रमुख मोहक पाटील व त्यांचे सहकारी, सचिन देसाई, नितीन देसाई, निवास रहाटे, हितेश पाटील,हितेश निर्मल,जितेंद्र मेहता,रोहित गोडाम्बे,अक्षय देसाई, व समर्थक अशा ४० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
हेही वाचा..
दिवंगत विनय आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन
छत्तीसगडच्या उत्तर बस्तरमधील अबुझमाड डोंगराळ वनक्षेत्र नक्षलमुक्त!
नोकरीसाठी रशियाला गेलेल्या तरुणाच्या हातात शस्त्र; युक्रेनविरुद्ध लढण्यास भाग पाडले!
गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे!
वसई विरार जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा पाटील, जेष्ठ नेते जोगेंद्र प्रसाद चौबे, मनोज पाटील, मनोज बारोट यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी त्यांचे स्वागत करताना भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून सर्वांना सन्मान व संधी दिली जाईल असा विश्वास जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा पाटील तसेच नेते मनोज पाटील यांनी व्यक्त केला.







