कोलकाता पोलीस भरती परीक्षेत दुसऱ्याला पाठवले

कोलकाता पोलीस भरती परीक्षेत दुसऱ्याला पाठवले

कोलकाता पोलिसांनी पोलीस भरती परीक्षेत स्वतःच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला बसवल्याच्या आरोपाखाली एका उमेदवाराला अटक केली आहे. या आरोपीने सब-इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज केला होता. पोलीसांनी रविवारी सांगितले की उमेदवार अब्दुल खालेक याला शनिवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यातून अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. यापूर्वी ३० डिसेंबर २०२५ रोजी पोलिसांनी लखाई घोष नावाच्या प्रॉक्सी उमेदवाराला अटक केली होती.

पोलीस सूत्रांनुसार, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अब्दुल खालेकने कोलकाता पोलीस सब-इन्स्पेक्टर भरती परीक्षेचे पहिले दोन टप्पे यशस्वीरीत्या उत्तीर्ण केले होते. मात्र तिसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षेला तो स्वतः गैरहजर राहिला. त्याच जिल्ह्यातील लखाई घोष नावाच्या व्यक्तीने त्याच्या जागी परीक्षा दिली. पोलिसांनी घोषला कोलकात्यातील परीक्षा केंद्रावर अटक केली. घोषच्या कबुलीजबाबाच्या आधारे आज खऱ्या उमेदवाराला अटक करण्यात आली. घोषने पोलिसांना सांगितले की तो आणि खालेक दोघेही परीक्षेची तयारी एकत्र करत होते.

हेही वाचा..

व्हेनेझुएलातील तणाव ठरवतील भारतीय शेअर बाजाराची दिशा

कुटुंबात संवाद, धर्म- परंपरेबाबत आदर यातूनच रोखला जाईल ‘लव्ह जिहाद’

भारताकडे आता रामबाण…रामजेटवर चालणारा तोफगोळा लष्करात दाखल

‘अमेरिका चालवणार व्हेनेझुएलाचा कारभार’

चौकशीत असेही समोर आले की घोषने पश्चिम बंगाल नागरी सेवा आणि पीएससी परीक्षा देखील उत्तीर्ण केल्या होत्या. पुढील परीक्षांची तयारी करण्यासाठी त्याला पैशांची गरज होती आणि म्हणूनच त्याने खालेकच्या जागी परीक्षा देण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेतले होते. शनिवारी खालेकला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्याला ८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारी वकील सौरिन घोषाल यांनी सांगितले की तिसऱ्या फेरीच्या परीक्षेत आरोपीच्या जागी दुसरी व्यक्ती बसली होती; मात्र मागील दोन फेऱ्यांच्या परीक्षा त्याने स्वतः दिल्या होत्या की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. खालेकच्या चौकशीतून ही माहिती समोर येईल, अशी पोलिसांना अपेक्षा आहे.

३० डिसेंबर रोजी घोष दक्षिण कोलकात्यातील न्यू अलीपूर कॉलेजमध्ये परीक्षा देत होता; मात्र त्याचा चेहरा प्रवेशपत्रावरील छायाचित्राशी जुळत नसल्याने परीक्षकांना संशय आला. त्याची सहीदेखील प्रवेशपत्रावरील सहीशी जुळत नव्हती. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

Exit mobile version