मुलीची छेड काढल्यावरून मालवणीत गुंडाची हत्या

पोत्यात भरून टाकून दिला मृतदेह

मुलीची छेड काढल्यावरून मालवणीत गुंडाची हत्या

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या रागातून मालवणी मधील स्थानिक गुंडाची हत्या करून मृतदेह मार्वे येथील नाल्यात फेकण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. १५ एप्रिल पासून बेपत्ता असलेल्या फहिम मचमच या गुंडाच्या हत्येप्रकरणी भायखळा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन संशयितांना मालवणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून मालवणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

फहीम सय्यद उर्फ फहीम मचमच (४२) असे या हत्या करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. भायखळा पोलिसांनी संशयावरून तिघांना अटक केली आहे. मात्र अद्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही. आरोपींनी मालाडच्या एका नाल्यात मृतदेह फेकला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मालाडच्या मालवणी येथे फहिम नजीर सय्यद उर्फ फहीम मचमच (४२) हा रहातो. फहिम हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. १७ एप्रिल पासून तो बेपत्ता होता.याप्रकरण फहीमची पत्नी रिदा सय्यद हिने २१ एप्रिल रोजी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी भायखळा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी ३ जणांना ताब्यात घेतले. त्यांनी फहिमची हत्या केल्याची कबुली दिली आहे. फहिमची हत्या करून त्याचा मृतदेह एका गोणीत भरला आणि मालाच्या मार्वे रोड येथील नाल्यात टाकून दिल्याची माहिती पोलिसांना दिली. सध्या त्याच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे, अशी माहिती भायखळा पोलिसांनी दिली.

हे ही वाचा:

पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे युट्युब अकाउंट भारतात ब्लॉक

अटलजी, चावला, एके-४७ आणि राऊत…

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना आले कोर्टाचे बोलावणे!

बोरिवलीचा काजूपाडा परिसर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी दणाणला

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने हत्या…

याबाबत माहिती देताना मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले की, मयत फहीम मचमच काही दिवसांपूर्वी त्याच्या मित्राच्या घरी रात्री गेला होता. त्याचा मित्र झोपला होता. त्यावेळी मित्राची १६ वर्षांची मुलगी घरात एकटी होती. ती संधी पाहून फहिमने तिचा विनयभंग केला. मुलीने हा प्रकार आपल्या मित्राला सांगितला.मित्राने त्याचा मित्र तसेच पीडित मुलीच्या भावाने घरी येऊन फहिमला जाब विचारला आणि त्याची हत्या केली. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह गोणीत भरून नाल्यात टाकून दिला. शुक्रवार संध्याकाळ पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आम्ही ताब्यात घेतेलल्या आरोपींची चौकशी करत आहोत तसेच मृतदेहाचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगरकर यांनी सांगितले. या हत्या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे? हत्या नेकमी कशी केली ते चौकशीनंतर समोर येईल असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version