सोमय्या यांच्यावर सिल्लोडमध्ये हल्ला, इस्लामी कट्टरपंथीयांचे कृत्य असल्याचा आरोप

पोस्टकरत दिली माहिती 

सोमय्या यांच्यावर सिल्लोडमध्ये हल्ला, इस्लामी कट्टरपंथीयांचे कृत्य असल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगर सिल्लोड येथे भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला आहे. सिल्लोड येथील सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यांच्यावर व त्यांच्या वाहनावर हा हल्ला झाला. किरीट सोमय्या यांनी एक्सवर पोस्टकरत या हल्ल्यामागे “मुस्लीम कट्टरपंथीयांचा” हात असल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी म्हटले, “सिल्लोड येथील सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुस्लिम अतिरेक्यांनी माझ्यावर/माझ्या गाडीवर हल्ला झाला आहे. सीआयएसएफ कमांडो जवानांनी हस्तक्षेप करून मला सुरक्षित ठेवलं.”

सोमय्या यांनी आज (१ सप्टेंबर) सिल्लोड पोलिस ठाणे आणि एसडीओ तहसीलदार कार्यालयात ११०० बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या फसवणुकीचे पुरावे सादर केले. त्यांनी राज्यभरात सुमारे २.२४ लाख अयोग्य, बेकायदेशीर घुसखोर व्यक्तींनी बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा किंवा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

या हल्ल्यानंतर त्यांनी सांगितले की, “माझी लढाई थांबणार नाही. महाराष्ट्रात बनावट कागदपत्रांद्वारे नागरिकत्व मिळवणाऱ्यांविरोधात माझा लढा सुरूच राहील.” पोलिसांकडून हल्ल्याबाबत अधिकृत तपास सुरू असून, यामध्ये कोणते गट सामील आहेत, हे शोधले जात आहे.

दरम्यान, ११०० जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी आज १ सप्टेंबर सकाळी ११ वाजता सिल्लोडला पोहोचणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली होती आणि त्यानंतर ही घटना घडली. सिल्लोडला जाण्यापूर्वी काही मुस्लिम नेत्यांनी चेतावणी दिल्याचेही त्यांनी सांगितले होते.

मुस्लीम नेत्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत निवेदन दिले होते. माजी खासदार किरीट सोमय्या हे सिल्लोड शहरात येऊन आम्हा भारतीय मुस्लिमांच्या नागरिक्तवासंदर्भात दिशाभूल करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून किरीट सोमय्या यांना आवर घाला नसता आंदोलन करण्याचा इशारा समस्त शहर वासीयांतर्फे पोलीस प्रशासन यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

हे ही वाचा : 

नऊ नक्षलवाद्यांचे एके-४७ सहित शस्त्रसाठ्यासह आत्मसमर्पण

मुहम्मद यूनुस गटाने बांगलादेशाला नरक बनवले

टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आली जवळ…

भारत आणि ब्राझील एकत्रितपणे हवामान बदलावर उपाय शोधणार!

निवेदनात नमूद केले आहे की,आमच्या पूर्वजांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेले आहे याचा विसर सोमय्या यांना पडला आहे. ते हेतुपुरस्कर मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचे काम करीत आहे आणि या कटामध्ये काही शासकीय अधिकारी देखील सोमय्यांच्या हाताची बाहुली बनून कोणतीच शहानिशा न करताच मुस्लिम समाजावर खोटे गुन्हे दाखल करत आहे.

या बाबीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत असून सिल्लोड शहरात सर्व समाज गुण्यागोविंदाणे राहत आले असून या समाजकंटकांच्या द्वेष पसरविण्याचे भूमिकेमुळे सिल्लोड शहरासह तालुक्यात जातीय तेढ निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळत आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असून या काळात देखील जाणून बुजून जातीय तेढ निर्माण व्हावा व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा या दूषित हेतूने किरीट सोमय्या सिल्लोड शहरात येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

किरीट सोमय्या यांना आवर घालावा अन्यथा आम्ही भारतीय मुस्लिम त्या अश्लील पार्श्वभूमी असलेल्या किरीट सोमय्या यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून संविधानात्मक पद्धतीने आंदोलन उभारू आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असे नमूद केले आहे.

निवेदनावर लखन ठाकूर,अख्तर मौलाना,कॉम्रेड सय्यद अनिस,मुखतार सादिक हुसैन,अकरम शेख,शेख शाकेर,फहीम खाँ मुनिर खाँ पठाण,शेख मुंतजिर उर्फ बल्लू ,शेख इमरान (उर्फ गुड्ड),साहेब खान पठाण,सलीम खान दादा,शेख नजीर यांच्या सह्या आहेत.

Exit mobile version