पत्नीच्या मृत्यू प्रकरणात पंकजा मुंडेंचे स्वीय सहाय्यक तीन दिवस एसआयटी पोलिस कोठडीत

पत्नीच्या मृत्यू प्रकरणात पंकजा मुंडेंचे स्वीय सहाय्यक तीन दिवस एसआयटी पोलिस कोठडीत

पत्नीच्या मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेले मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अनंत गर्जेची १८ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपी अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी हिच्या मृत्यू प्रकरणी विशेष तपास पथक ‘एसआयटी’ नेमण्यात आली आहे, सोमवारी एसआयटीने अनंत गर्जे यांचा तुरुंगातुन ताबा घेऊन अटक केली आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अनंत गर्जेला पुन्हा अटक करत न्यायालयात हजर केले. अनंत गर्जेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असली, तरी आरोपीने दिलेल्या जबाबांमध्ये संदिग्धता आढळून आल्याने वाढीव पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद एसआयटीने केला.

तपासादरम्यान अद्याप काही आरोपी फरार असून, त्यांना अटक करणे बाकी आहे. तसेच आरोपी अनंत गर्जेला फरार आरोपींचा ठावठिकाणा माहिती असल्याचा संशय असून, त्याबाबत सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात नमूद केले.

हे ही वाचा:

‘मनरेगा’ रद्द करून नवीन ग्रामीण रोजगार कायदा आणणार?

तेजस्वी घोसाळकरांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र; भाजपात प्रवेश!

‘धुरंधर’ने ओलांडला ५०० कोटींचा टप्पा!

पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या माजी आमदाराची काँग्रेसमधून हकालपट्टी

दरम्यान, शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याने वाढीव पोलिस कोठडीची गरज नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने अनंत गर्जेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version